दिनविशेष १८ मे
दिनविशेष
दि. १८ मे
* आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन
* InternationalMuseumDay
आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन जगभरात साजरा करण्याची कल्पना प्रथम इंटरनेशनल काउंसिल ऑफ म्यूजियम द्वारे मांडली गेली आणि १९७७ पासून हा दिवस १८ मे रोजी साजरा करण्यास सुरवात झाली. लोकांना इतिहासबद्दल माहिती देण्यासाठी व त्यासंबंधी वस्तू जपण्यासाठी जगभरातील संग्रहालये चांगले कार्य करत आहेत
१. (१६८२) छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे रूपांतर बलाढ्य मराठा साम्राज्यात करणारे कुशल प्रशासक, राजधानी सातारा चे जनक शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज (सातारा) यांचा जन्म
२. (१८४६) मराठी पत्रकारितेचे पितामह बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन
ते मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. या वृत्तपत्रात इंग्रजी व मराठी भाषेमध्ये मजकूर असायचा. या वर्तमानपत्राचा उद्देश हा स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि लोकांना त्या देशांची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण याविषयी स्वतंत्र विचार करता व्हावा हा होता
३. (१९२१) शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुस्कर यांचा जन्म
अभिजात हिंदुस्तानी संगीतामधील ग्वाल्हेर घराण्याचे पंडित दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुस्कर हे गायकांचे मुकुटमणी आहेत. अल्पायुषी ठरलेला हा मधुरकंठी गायक आपल्या अद्भुत गानकलेचा वारसा मागे ठेवून गेला. वयाच्या चौदाव्या वर्षी द. वि. पलुस्कर यांचे गाणे जालंधरला झाले होते. छोट्या अवधीमध्ये एखादा राग उत्कृष्ट प्रकारे सादर करण्यामध्ये त्यांची विलक्षण हातोटी होती. दुर्दैवाने केवळ ३४ वर्षांचे अल्पायुष्य त्यांना लाभले. पण याही छोट्या आयुष्यात पलुस्करांनी पुणे, नाशिक, कुरुंदवाड, कलकत्ता, लखनौ, बनारस, पतियाळा, जालंधर, अमृतसर अशा भारतभरांतील शहरांत शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले. त्यांची गायकी देशभर लोकप्रिय होती
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment