दिनविशेष ०८ एप्रिल
दिनविशेष
दि. ०८ एप्रिल
१. (१८५७) १८५७ च्या बंडातील आद्यक्रांतीकारक मंगल पांडे यांचे निधन
२. (१८९४) वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममिमांसक सुधारक बंकिमचंद्र चटर्जी यांचे निधन
३. (१९२२) संगीत पुरुषोत्तम भास्करबुवा बखले यांचे निधन
ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या तीन घराण्यांची तालीम घेणारे भास्करबुवा हे त्या काळात एकमेव गायक होते. तीन गुरूंच्या गायकीतून एक नवीन सौंदर्यलक्षी, सर्वांग परिपूर्ण गायकी बुवांच्या गळ्यातून अवतरली. साधे साधे रागही किती आशयघन, श्रवणीय असू शकतात, हे बुवांनी दाखवलं, ऐकवलं
४. (१९२४) हिंदुस्तानी शास्त्रीय गायक कुमार गंधर्व यांचा जन्म
ते हिंदुस्तानी शास्त्रीय गायक होते. तत्कालीन हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील घराण्यांच्या पारंपरिक भिंती भेदून त्यांनी स्वतःची आगळ्या ढंगाची गायकी घडवली
५. (१९२८) नामवंत मराठी साहित्यिक रणजित देसाई यांचा जन्म
त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील 'श्रीमान योगी' या कादंबरीसाठी मराठी साहित्य विश्वात त्यांना मानाचे स्थान आहे
६. (१९७४) मराठी नाट्यसृष्टीचा इतिहास घडवणारे अभिनेते, नटश्रेष्ठ गोपाळ गोविंद फाटक उर्फ नानासाहेब फाटक यांचे निधन
ते मराठीतले एक नटश्रेष्ठ म्हणून गणले गेलेले नाट्य-अभिनेते होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment