दिनविशेष ०७ एप्रिल

दिनविशेष

दि. ०७ एप्रिल

* जागतिक आरोग्य दिन

जागतिक स्तरावर स्वास्थ्य आणि आरोग्याचं संवर्धन करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाद्वारे (United Nations) जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) स्थापना ७ एप्रिल १९५० रोजी झाली. व्यक्तिगत आणि सामाजिक आरोग्याची लोकांना जाणीव करुन देण्यासाठी हा दिवस तेव्हापासून ’जागतिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो


१. (१९२०) सुप्रसिद्ध सतारवादक भारतरत्न पंडित रविशंकर यांचा जन्म

ते एक भारतीय संगीतज्ञ व सुप्रसिद्ध सतारवादक होते. ते इ. सन २० व्या शतकातील सतारवादनातील एक श्रेष्ठतम वादक मानले जात. अभिजात भारतीय संगीत परंपरेची ओळख पाश्चात्त्य जगतास करून देण्याच्या प्रयत्‍नांत त्यांनी मोलाची भूमिका बजावली

२. (१९३५) भारतीय शास्त्रज्ञ डॉ. शंकर आबाजी भिसे यांचे निधन

दोनशेच्या वर निरनिराळे शोध लावण्याचा रेकॉर्ड शास्त्रज्ञ डॉ. शंकर आबाजी भिसे यांच्या नावावर आहे. त्यांतील ४० हून अधिक आविष्कारांची त्यांनी पेटंटे घेतली. भारताचे एडिसन' म्हणून त्यांना संबोधले जात. सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांची होती. आज आपण प्रत्येक लोकलच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘इंडिकेटर’ बोर्ड पाहतो. त्या इंडिकेटर बोर्डाचे निर्माते डॉ. भिसे आहेत
 
३. (१९७७) चित्रपट अभिनेते, लेखक आणि गीतकार राजा बढे यांचे निधन

त्यांना सुरुवातीला नागपूरमध्ये कवी म्हणून प्रसिद्धी मिळाली. नंतर ते मुंबईत आले. सन १९५६ ते १९६२ या काळात ते मुंबई आकाशवाणीवर सुगम संगीत विभागाचे प्रोड्यूसर होते. त्यांनी शिवाजी राजांवर एक चित्रपट निर्माण केला

४. (२०२१) गिरणी कामगारांचे लढवय्या नेते, राष्ट्र सेवादलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ता इस्वलकर यांचे निधन

मुंबईतली ऐतिहासिक गिरणी कामगारांच्या संपात वाताहत झालेल्या गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळावी यासाठी लढा उभारणारे कामगार नेते म्हणून दत्ता इस्वलकर यांची ओळख होय

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर