दिनविशेष दि. २८ ऑगस्ट ◆ जन्म १. (१९०६) रंगभूमी अभिनेते चिंतामणी गोविंद तथा मामा पेंडसे यांचा जन्म ते मराठीतले एक अग्रगण्य नाट्य-अभिनेते होते २. (१९१८) प्रसिद्ध मराठी चित्रपट संगीतकार राम कदम यांचा जन्म राम कदम 'लावण्या' प्रकारातील गाण्यासाठी नावाजलेले संगीतकार म्हणून प्रसिद्ध होते. तसेच त्यांनी चित्रपट माध्यमातूनही आपल्या संगीताचा ठसा उमठवला आहे. राम कदम यांनी १९४० ते १९९० या कालावधीत मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. राम कदम यांनी जवळजवळ २०० चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत, परंतु त्यांनी जास्तीत जास्त लावण्याच गायल्या आहेत. राम कदम यांनी १९७२ मध्ये पिंजरा चित्रपटांसाठी गायलेली 'मला लागली कुणाची उचकी' ही लावणी खूप गाजली होती ३. (१९२८) सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद विलायत खॉं यांचा जन्म ● निधन १. (१९६९) भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचे निधन रावसाहेब पटवर्धन हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी स्वातंत्र्यसैनिक होते. रावसाहेब पटवर्धन यांनी अहमदनगर येथील आपल्या भाषणांनी स्वातंत्र्यलढ्याला नवी चेतना दिली. त्यांचे विचार ऐकून अनेक तरुण स्वातं...
दिनविशेष दि. १४ डिसेंबर ■ दिनविशेष १. राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिन (National Energy Conservation Day) ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व लोकांना पटवून सांगण्यासाठी आणि ऊर्जा कार्यक्षमता तसेच संवर्धन अशा क्षेत्रात, भारताच्या उपलब्धी लोकांसमोर आणण्याच्या हेतून, दरवर्षी १४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो भारतातील राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचे उद्दिष्ट लोकांना उर्जेचे महत्व तसेच बचत आणि ऊर्जा बचतीद्वारे संवर्धनाची जाणीव करून देणे आहे. उर्जेचा अनावश्यक वापर कमी करून, कमी उर्जेचा वापर करून उर्जेची बचत करणे हा ऊर्जा संवर्धनाचा खरा अर्थ आहे. भविष्यातील वापरासाठी उर्जेची बचत करण्यासाठी कार्यक्षमतेने वापरणे अत्यंत आवश्यक आहे. ऊर्जा संवर्धन नियोजनाच्या दिशेने अधिक परिणामकारक परिणाम मिळविण्यासाठी, प्रत्येक मानवी वर्तनाची गांभीर्याने काळजी घेऊन ऊर्जा वाचवता येते. दैनंदिन वापरातील अनेक विद्युत उपकरणे ऊर्जा संवर्धन मोहिमेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अतिवापराची ऊर्जा वाचवण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे ◆ जन्म १. (१९०५) लेखक, कादंबरीका...
दिनविशेष दि. २१ ऑक्टोबर ■ दिनविशेष १. पोलीस स्मृती दिन २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांना वीर मरण आले होते. तेव्हा पासून २१ ऑक्टोबर हा पोलिस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो वर्षभरात जे जवान देशात आणि राज्यात शहीद झाले अशा जवानांना या २१ ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली वाहिली जाते. जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये या निमित्ताने शहीद पोलिसांना अभिवादन करण्यात येते. यासोबतच विविध उपक्रमाचे आयोजनही करण्यात येते ◆ जन्म १. (१८३३) स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या पाच क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक नोबेलने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली होती. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला. ...
Comments
Post a Comment