दिनविशेष ०३ एप्रिल

दिनविशेष

दि. ०३ एप्रिल

१. (१६८०) छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत


२. (१९०४) इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समुहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांचा जन्म

ते इंडियन एक्‍स्प्रेस वृत्तपत्र समूहाचे संस्थापक अध्यक्ष आणि स्वातंत्र्य चळवळीतील ज्येष्ठ नेते होते. १९३२ मध्ये त्यांनी इंडियन एक्स्प्रेस ही संस्था सुरू केली आणि विविध इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेच्या प्रकाशनातून इंडियन एक्सप्रेस ग्रुप तयार केला. २००० साली टुडे मासिकाने त्यांचे नाव १०० लोकांच्या आकार देणाऱ्या भारतातील यादीमध्ये ठेवले. रामनाथ गोएंका यांच्या नावाने ओळखले जाणारे रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम अवॉर्ड हे भारतीय पत्रकारांसाठी सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहेत

३. (१९१४) भारताचे माजी सैन्यप्रमुख फील्ड मार्शल सॅम माणेकशाॅ यांचा जन्म

७ जून १९६९ रोजी त्यांनी जनरल कुमार मंगलम यांच्याकडून सैन्यप्रमुख पदाची सुत्रे हाती घेतली. १९७१ च्या भारत-पाक युद्धात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली होती. या युद्धात भारताने माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा पराभव केला व बांगलादेशाची निर्मिती केली

४. (२०१७) हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका पद्मभूषण किशोरीताई आमोणकर यांचे निधन

ह्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्या जयपूर घराण्याच्या शैलीत गायन करत असत. त्या एक श्रेष्ठ गायिका होत्या व आदराने त्यांना 'गानसरस्वती' असे संबोधले जात असे

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर