दिनविशेष ११ एप्रिल
दिनविशेष
दि. ११ एप्रिल
१. (१८२७) शिक्षणमहर्षी, थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य जोतीराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म
ते भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले
महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. जोतिरावांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी किंवा भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. मागास जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली
२. (१८६९) महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचा जन्म
कस्तुरबा गांधींनी पतीच्या राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला. १९१५ मध्ये गांधीजी निळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहासाठी जेव्हा परतले, तेव्हा कस्तुरबाही त्यांच्याबरोबर भारतात आल्या. त्यांनी त्या शेतकऱ्यांच्या बायका आणि मुलांना साक्षरता आणि स्वच्छतेचे धडे दिले
३. (१९५५) अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा जन्म
या रंगभूमीवरील व चित्रपटांतील ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. रिचर्ड ॲटनबरो निर्मित 'गांधी' या चित्रपटातील 'कस्तुरबा'च्या भूमिकेमुळे त्या आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात पोहोचल्या
४. (२००९) प्रसिद्ध भारतीय लेखक व नाटककार विष्णु प्रभाकर यांचे निधन
प्रगतीवाद कालखंडातील प्रसिद्ध भारतीय हिंदी लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. हिंदी साहित्यात कथा, नाटक व कादंबरी हे साहित्यप्रकार त्यांनी विशेषत्वाने हाताळले आहेत. बालसाहित्य लेखनातही त्यांचे अतुलनीय योगदान आहे
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment