दिनविशेष ०५ मार्च

दिनविशेष

दि. ५ मार्च

१. (१९१३) किरण घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगुबाई हनगळ यांचा जन्म

या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. वयाच्या अकराव्या वर्षी, म्हणजे इ.स. १९२४ मध्ये, त्यांनी बेळगांव येथे महात्मा गांधीच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या (इंडियन नॅशनल काँग्रेसच्या) अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलम आझाद आणि सरोजिनी नायडू यांच्या उपस्थितीत स्वागतगीत गायले. हा त्यांचा पहिला जाहीर कलाविष्कार होता

गंगूबाईंच्या आई अंबाबाई या कर्नाटक शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्यामुळे त्यांच्या बालपणापासून आईने त्यांना संगीताचे प्राथमिक शिक्षण व संस्कार दिले. धारवाड येथे प्रतापलाल व श्यामलाल यांच्याकडे लहान असतानाच त्यांनी काही काळ कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले. हिंदुस्थानी गायकीचे शिक्षण त्यांनी कृष्णाचार्य हुळगूर यांच्याकडे घेतले


२. (१९८५) कोशागार, तत्वज्ञ तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक देविदास दत्तात्रय वाडेकर यांचे निधन

ते तत्त्वज्ञानाचे विख्यात प्राध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ होते. ते डी. डी. वाडेकर या नावाने प्रसिद्ध असून पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य आणि फर्गसन महाविद्यालयात प्राध्यापक होते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर