दिनविशेष ३१ मार्च
दिनविशेष
दि. ३१ मार्च
१. (१८४३) आधुनिक मराठी नाट्यकलेचे जनक व संगीत नाटक युगप्रवर्तक बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म
अण्णासाहेब हे मराठी भाषेतील पहिले संगीत नाटककार, गायकनट आणि नाट्यशिक्षक होते. अण्णासाहेब किर्लोस्करांनी ३१ ऑक्टोबर १८८० या दिवशी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ‘शाकुंतल’ या पहिल्या परिपूर्ण संगीत नाटकाचा पहिला प्रयोग केला
२. (१९७२) भारतीय चित्रपट विश्वाला लाभलेली गायिका, कवयित्री व रूपवान अभिनेत्री मीना कुमारी यांचे निधन
अनेक चित्रपटात शोकात्मक व शोकांतक भूमिका केल्यामुळे त्यांना 'ट्रॅजेडी क्वीन' ही म्हणत असत. त्यांना कधीकधी भारतीय चित्रपटांची सिंड्रेला असेही संबोधण्यात येत होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment