दिनविशेष ०४ मार्च

दिनविशेष

दि. ४ मार्च

* राष्ट्रीय सुरक्षा दिन

दरवर्षी ४ मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय सुरक्षा दिन हा देशाची आणि सामाजिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी जागरूकतेचा विषय आहे. 'सावधानी हटी, दुर्घटना घटी' असे अनेक संदेश आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात अनेकदा ऐकतो कारण आजच्या युगात आपण सावधगिरी बाळगणे आणि सुरक्षित राहणे अत्यंत आवश्यक आहे. आपण महामार्ग, रस्ता, वाहन किंवा कामाच्या ठिकाणी असे संदेश अनेकदा पाहिले असतील कारण हे संदेश शासनाच्या सूचनेनुसार टाकले आहेत जेणेकरून आपण कोणत्याही अपघातासाठी सतर्क रहावे

अपघातापासून सावध राहण्यासाठी आणि सतर्क राहण्यासाठी भारतात दरवर्षी ४ मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश तुम्हाला रस्ता सुरक्षा, कामाची जागा, पर्यावरण, निरोगी आणि स्वत: ची सुरक्षितता याबद्दल जागरुक करणे हा आहे. ४ ते १० मार्च हा संपूर्ण आठवडा मोहीम म्हणून साजरा केला जातो



* जागतिक लठ्ठपणा दिन

जागतिक लठ्ठपणा दिन हा ४ मार्च रोजी साजरा केला जातो. लठ्ठपणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे, गैरसमज दूर करणे आणि या वैद्यकीय स्थितीबद्दल जागरूकता वाढविणे या उद्देशाने दरवर्षी जागतिक लठ्ठपणा दिन साजरा केला जातो. चरबीच्या स्वरूपात शरीराचे अतिरिक्त वजन वाढते. यामुळे हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. गंभीर संधिवात आणि अगदी काही विशिष्ट कर्करोगही यामुळे होऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, २५ किंवा त्यापेक्षा जास्त बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) जास्त वजन आणि ३० किंवा त्यापेक्षा जास्त बीएमआय लठ्ठ मानला जातो

हे जगभरातील एक सार्वजनिक आरोग्य संकट आहे जिथे जगातील एकूण लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोक याचा त्रास घेतात आणि सुमारे ५ पैकी १ मुले आणि ३ पैकी १ प्रौढ लोक याचा सामना करतात. उच्च रक्तदाब, मधुमेह, इस्केमिक हृदयरोग, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, गॉल स्टोन, ॲसिडिटी, स्ट्रोक, कॅन्सर, ऑस्टिओपोरोसिस, वंध्यत्व आणि मानसिक आघात अशा असंख्य सहव्याधी लठ्ठपणाशी संबंधित आहेत

१. (१८६८) चलत चित्रपटाचे प्रवर्तक हरीश्चंद सखाराम भाटवडेकर ऊर्फ सावे दादा यांचा जन्म

सावे दादा व्यवसायाने फोटोग्राफर. फोटो काढला की माणूस मरतो अशी समजूत त्याकाळी भारतात रूढ होती. जिवंत व्यक्तीचे यंत्राने छायाचित्र घेण्याच्या प्रकाराला ज्या काळात भारतातील रूढीप्रिय मन बिचकत होते, त्या काळात तरुणपणी छायाचित्रकाराचा व्यवसाय करणारे भाटवडेकर उर्फ सावे दादा हे धाडसी द्रष्टेच होते असे म्हणावे लागेल

वॅटसन हॉटेलमध्ये ल्युमिए बंधूंच्या सिनेमाचे खेळ पाहून त्यातून चित्रपट बनवण्याची प्रेरणा त्यांनी घेतली. या खेळांनी त्यांना एक नवी दिशा दाखवून प्रयोगासाठी उद्युक्त केले, आपण असे चलचित्रांचे खेळ दाखवावे असा असे त्यांना वाटू लागले. त्यांनी यासाठी प्रोजेक्टर आणि काही छोटी चित्रपट विकत घेतले. मुंबईतल्या श्रीमंत कुटुंबातून या चित्रपटांचे खेळ वाढदिवसादिवशी, विशेष समारंभप्रसंगी करू लागले. सावेदादा दाखवत असलेल्या चित्रपटात ‘ कॅन कॅन डान्स ’ हा रंगीत चित्रपट ही होता

२. (१९८५) साहित्यिक डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचे निधन

ते मराठीतील निबंधकार व विचारवंत म्हणून ओळखले जातात. ते एम.ए. पीएच.डी होते. पाश्चात्य व पौर्वात्य शास्त्रांचे ते अभ्यासक होते. 'विज्ञान- प्रणीत समाजरचना' व 'स्वभावलेखन' हे त्यांचे प्रारंभीचे ग्रंथ होत

धर्म, राजकारण, समाजरचना, अर्थकारण, विज्ञान, कला, साहित्य व शिक्षण अशी संस्कृतीची आठ प्रधान अंगे आहेत. या आठही अंगांचे विवेचन उपलब्ध माहितीच्या आधारे या ग्रंथात केलेले आहे. या ग्रंथाची प्रकरणे ’वसंत’ मासिकात १९६८ सालापासून ते १९७८ च्या ऑक्टोबरपर्यंत क्रमशः येत होती

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर