दिनविशेष ३० मार्च

दिनविशेष

दि. ३० मार्च 

१. (१९४२) मराठीचे भाषातज्‍ज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके यांचा जन्म

१९६६ साली 'योगभ्रष्ट' या दीर्घ कवितेमुळे ते प्रकाशात आले. त्यांच्या 'चित्रलिपी' या संग्रहाकरिता २००९ सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. फेब्रुवारी २०१२ च्या चंद्रपूर येथे झालेल्या ८५ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते


२. (२००२) हिंदी गीतकार व कवी आनंद बक्षी यांचे निधन

तुमचे-आमचे जीवन फुलवणारी, अविस्मरणीय गाणी त्यांनी गायली. शब्दांच्या या जादूगाराने आपल्या गीतांनी रसिकांना जणू मोहिनीच घातली. प्रेमाची ओढ असो की विरह, आई-मुलातील वात्सल्य असो की मरणाची अपरिहार्यता असो, आनंद बक्षींच्या लेखणीने या सर्व भावना रसिकांच्या मनी ठसायच्या

संगीतकार लक्ष्मीकांत - प्यारेलाल यांच्याबरोबर आनंद बक्षी यांचे सूर जुळले. या त्रयीने अनेक अविस्मरणीय गाणी दिली आहेत. आने से उसके आये बहार (जीने की राह), बिंदिया चमकेगी (दो रास्ते), सावन का महीना (मिलन), मैं शायर तो नहीं (बॉबी), परदा है परदा (अमर अकबर अँथोनी), आदमी मुसाफिर है (अपनापन), डफलीवाले (सरगम), ओम शांती ओम (कर्ज) ही आनंद बक्षी-लक्ष्मी-प्यारे या त्रयींची काही सुपरहिट गाणी. लक्ष्मी- प्यारे यांच्याप्रमाणेच राहुलदेव बर्मन (आरडी) यांच्याबरोबरही आनंद बक्षी यांचे सूर जुळले. ना कोई उमंग है (कटी पतंग), रैना बीती जाए (अमर प्रेम), महेबूबा महेबूबा (शोले), परबत के पीछे (महेबूबा), सावन के झूले पडे (जुर्माना), दम मारो दम (हरे राम) ही आरडी-आनंद बक्षी यांची काही गाजलेली गाणी. कल्याणजी - आनंदजी, अन्नू मलिक, राजेश रोशन या संगीतकारांसाठीही आनंद बक्षी यांनी अनेक अविस्मरणीय गाणी दिली आहेत

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर