दिनविशेष २८ मार्च

दिनविशेष

दि. २८ मार्च

१. (१९२५) सातारा जिल्हातील सिद्धेश्वर कुरोली ता. खटाव गावचे सुपुत्र, मराठी चित्रपट सृष्टीतील ६० च्या दशकातील विनोदाचे बादशाह अशी ओळख असलेले राजाराम शंकर उर्फ राजा गोसावी यांचा जन्म

ते सुरुवातीला कामगार म्हणून नाट्य क्षेत्रात शिरले आणि ’नटसम्राट’ म्हणून बाहेर पडले. राजा गोसावी यांनी १०० हून अधिक चित्रपटांतून आणि जवळपास ५० नाटकांत कामे केली

मराठी सिनेमात निरोगी विनोदाची मुहूर्तमेढ मास्टर विनायकांनी रोवली असली, तरी ती पुढे समर्थपणे चालवली राजा गोसावी यांनी. राजा गोसावी खऱ्या अर्थाने चतुरस्र कलावंत होते. त्यांनी रंगविलेला मध्यमवर्गीय/शहरी नायक रसिकांना मनापासून भावला. त्यांच्या चित्रपटाची घोडदौड एकोणीसशे पन्नासच्या दशकापासूनच सुरू होती. त्यांचा बोलबाला एवढा होता की, १९५८ मध्ये पुण्याच्या बाबुराव गोखलेंनी राजा गोसावीला तिहेरी भूमिकेत चमकवत ’राजा गोसावीची गोष्ट' हा चित्रपट काढला होता. साठच्या दशकात राजा गोसावी यांनी शरद तळवलकर, दामुअण्णा मालवणकर यांच्यासमवेत अनेकानेक उत्तमोत्तम सिनेमे दिले. त्यांच्या अभिनयातील विनोदात निरागसता आणि नैसर्गिकता होती


२. (२०००) लेखक शांताराम द्वारकानाथ तथा राम देशमुख यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर