दिनविशेष २७ मार्च
दिनविशेष
दि. २७ मार्च
* जागतिक रंगभूमी दिन
रंगभूमीवरील कलाविष्काराचे जागतिकीकरण व्हावे यासाठी २७ मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा केला जातो 🎭
१. (१८९८) भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचे निधन
ते १९ व्या शतकातील एक भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होत. भारतातील मुस्लिम समाजामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करून त्यांचा सामाजिक विकास साधण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. सर सय्यद यांनी मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली ज्याला त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १९२० मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणून विद्यापिठाचा दर्जा देण्यात आला
२. (१९६८) पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन यांचे निधन
'युरीने 'वोस्तोक' या अंतराळ यानातून त्यांनी अवघ्या वीस मिनिटांत पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. त्यांना 'हिरो ऑफ सोविएत युनियन' हा तेव्हाचा सर्वोच्च किताब प्रदान करण्यात आला होता
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment