दिनविशेष २५ मार्च

दिनविशेष

दि. २५ मार्च

१. (१९३१) भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचे निधन

ते एक भारतीय पत्रकार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते होते. असहकार चळवळ आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील ते एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी व्हिक्टर ह्यूगोच्या नाइन्टी-थ्री या कादंबरीचा अनुवाद केला होता. त्यांना मुख्यतः 'प्रताप' या हिंदी भाषेतील वृत्तपत्राचे संस्थापक-संपादक म्हणून ओळखले जाते

२. (१९३२) लेखक व कथा कथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचा जन्म

वसंत पुरुषोत्तम काळे, हे मराठी भाषेतील प्रसिद्ध लेखक होते. ते व. पु. काळे या नावाने प्रसिद्ध होते. त्यांनी ६० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. पार्टनर, वपुर्झा, ही वाट एकटीची आणि ठिकरी ही त्यांची पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत

कथा, ललित लिखाण, नाटक अशा सर्व लेखन प्रकारात त्यांनी लिखाण केले. त्यांच्या कथा जिवंत माणसांच्या, नातेसंबंधांच्या, स्वैर वेड्या मनाचे विविध कांगोरे अधोरेखित करणाऱ्या असत. वपुंची कथा वाचताना डोळ्यासमोर कथेचे कथानक तरळते


३. (१९३३) अवकाश संशोधन, हवामान शास्त्र या क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांचा जन्म

ते भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ होते. ते इ.स. १९९१ ते इ.स. १९९३ या काळात भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. वसंत गोवारीकर इ.स. १९९४ ते इ.स. २००० या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. ते ज्ञान प्रबोधिनी संस्थेशी दीर्घ काळ निगडित होते. हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीच्या शाळेतील विज्ञान प्रयोगशाळेला डॉ. गोवारीकरांचे नाव देण्यात आले आहे

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर