दिनविशेष १९ मार्च
दिनविशेष
दि. १९ मार्च
१. (१८९७) चित्रपट संगीतकार शंकर विष्णू तथा दादा चांदेकर यांचा जन्म
दादा चांदेकर हार्मोनियमवादक होते. पुणे आकाशवाणीवर संगीत दिग्दर्शक आणि संगीत परीक्षक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले
२. (१९३८) मराठी लेखिका, नाटककार, बालनाट्ये लिहून रंगमंचावर सादर करणाऱ्या पटकथाकार व चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्या सई परांजपे यांचा जन्म
त्यांची सुरुवातच मुळात बाल वयातील लेखिका म्हणून झाली. पुढे त्यांच्या लेखणीला सखोलता प्राप्त झाली आणि अल्पावधीतच त्या यशस्वी आणि लोकप्रिय लेखिकाही झाल्या. 'समांतर' चित्रपट या वर्गवारीत येणारे अनेक चित्रपट त्यांनी प्रामुख्याने दिग्दर्शित केले आहेत
३. (१९८२) स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी जीवटराम भगवानदास तथा आचार्य कृपलानी यांचे निधन
भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस कृपलानी हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. ते महात्मा गांधी चे अनुयायी होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment