दिनविशेष १८ मार्च

दिनविशेष

दि. १८ मार्च

१. (१५९४) पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन व स्वतंत्र राज्यकारभार ही मूलभूत गुण-कौशल्य असलेले ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व स्वराज्यसंकल्पक शहाजी राजे भोसले यांचा जन्म

छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वडील होतं. शहाजीराजांनी आपले पुत्र शिवाजी महाराजांना पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवून स्वराज्य स्थापनेसाठी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली


२. (१९०५) मराठीतल्या स्त्रीवादी लेखिका मालती बेडेकर यांचा जन्म

या मराठीतल्या आद्य स्त्रीवादी लेखिका समजल्या जातात. त्यांनी सहा कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, सहा प्रबंध, प्रौढ साक्षरांसाठी चार पुस्तके, पाच नाटके आणि एक चित्रपटकथा लिहिली. तसेच पाच इंग्लिश पुस्तकांची मराठी भाषांतरे केली

विभावरी शिरुरकर या टोपण नावानं त्यांनी त्या काळात स्त्रीजीवनाचं केलेलं लेखन खळबळजनक ठरलं. या नावाने लिहलेली त्यांची बळी, शबरी व घराला मुकलेल्या स्त्रिया ही पुस्तके खूप गाजली. ही पुस्तके लिहिण्यापूर्वी श्रद्धा, बी.के., कटुसत्यवादिनी, एक भगिनी किंवा बाळुताई खरे या नावांनीही मालतीबाईंनी लेखन केले

३. (१९३८) हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते शशी कपूर यांचा जन्म

हे हिंदी चित्रपटसृष्टीतले एक अभिनेते आणि दिग्दर्शक होते. त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि मोठे बंधू राज कपूर यांच्यामुळे त्यांच्या घरात पहिल्यापासून सिनेमाचे वातावरण होते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर