दिनविशेष ११ मार्च

दिनविशेष

दि. ११ मार्च

१. (१६८९) स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे निधन

छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याच्या विस्तार आणि बचाव केला. मराठा साम्राज्याच्या १५ पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एकहाती लढा दिला. संभाजी महाराजांनी गनिमी कावा पुरेपूर वापरत औरंगजेबाला पुरते जेरीस आणले होते. संभाजी राजेंनी आपल्या कार्यकाळात एकूण १२० युद्धे लढली. महत्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना १२० पैकी एकही लढाईत अपयश आले नाही. असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते


२. (१९७९) 'नवा काळ' चे दुसरे संपादक यशवंत कृष्ण उर्फ अप्पासाहेब खाडिलकर यांचे निधन

१९२९ ते १९६८ अशी जवळपास ४० वर्षे 'नवा काळ'ची जबाबदारी यशस्वीपणे त्यांनी पार पाडली. मार्मिक, तर्कशुद्ध आणि उपरोधाचा स्वर असलेले त्यांचे अग्रलेख अतिशय लोकप्रिय असत

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर