दिनविशेष ०२ मार्च
दिनविशेष
दि. २ मार्च
१. (१८५७) जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई येथे सुरु झाले
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ही भारतातील कला शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था आहे
२. (१९२५) चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री शांता जोग यांचा जन्म
त्या मराठीतल्या एक नाट्य-चित्रपट अभिनेत्या होत्या. वि. वा. शिरवाडकर यांच्या 'नटसम्राट'मध्ये बेलवलकरांच्या भूमिकेत असलेले श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी आणि चंद्रकांत गोखले या चारही नटसम्राटांच्या बरोबर पत्नी कावेरी हिची भूमिका शांता जोग यांनी साकारली होती
३. (१९४९) प्रभावी वक्त्या आणि स्वातंत्रसेनानी सरोजिनी नायडू यांचे निधन
त्या एक राजकीय कार्यकर्त्या आणि कवयित्री होत्या. नागरी हक्क, महिला मुक्ती आणि साम्राज्यवाद विरोधी विचारांच्या समर्थक, वसाहतवादी राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात त्या एक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. नायडू यांच्या कवितांमुळे त्यांना 'भारताची नाइटिंगेल' किंवा 'भारत कोकिला' ही उपाधी महात्मा गांधी यांच्याकडून मिळाली. यामागे त्यांच्या कवितेतील रंग, प्रतिमा आणि गीतात्मक गुणवत्ता ही कारणे होती
४. (१९८६) मराठी चित्रपट अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे निधन
ते मराठी नाट्यअभिनेते व हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते होते. सन १९६० ते १९९० या काळातले ते मराठीतले पहिले सुपर स्टार होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment