दिनविशेष १० फेब्रुवारी

दिनविशेष

दि. १० फेब्रुवारी 

१. (१८०३) मोठे दानशूर व्यक्ती व शिक्षणतज्ञ जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ मुरकुटे यांचा जन्म

ते मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती होते. मुंबई शहराच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी स्वतः मिळवलेल्या अमाप संपत्तीपैकी मोठा हिस्सा दान केला तसेच सार्वजनिक कामांकरीता खर्च करून टाकला. एक थोर समाजसेवक, शिक्षणप्रेमी व आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक होत

२. (१९१०) मराठी साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ दुर्गा भागवत यांचा जन्म

त्या मराठी लेखिका होत्या. वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात त्यांचे मोठे योगदान आहे. यांत लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्धसाहित्य, कथा, चरित्र, ललित, संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक लेखन यांचा समावेश होतो. त्यांना फ्रेंच, जर्मन, इंग्रजी, संस्कृत, पाली या भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यांचे संस्कृत, पाली आणि इंग्लिश भाषेमध्येही लेखन आहे

३. (१९८२) विद्वान, टीकाकार आणि लेखक नरहर कुरुंदकर यांचे निधन

ते मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक होते. ते एक प्रभावी वक्ते होते. कुरुंदकरांनी अनेक पुस्तकांना प्रदीर्घ प्रस्तावना लिहिल्या आहेत. त्‍यांनी लिहिलेल्या प्रस्तावनांमधून आठ प्रस्तावनांची निवड करून ‘निवडक नरहर कुरूंदर’ हे संपादित पुस्तक आकाराला आलेले आहे. त्यांच्या 'धार आणि काठ' या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर