दिनविशेष ८ फेब्रुवारी

दिनविशेष

दि. ८ फेब्रुवारी 

१. (१८९७) भारताचे तिसरे राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचा जन्म

ते भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. मे १३, इ.स. १९६७ ते मे ३, इ.स. १९६९ पर्यंत त्यांनी राष्ट्रपतीपद सांभाळले. हुसेन नामवंत शिक्षणतज्ज्ञ होते. १९५७  ते १९६२  या काळात त्यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून कार्य केले. इ.स. १९६३ मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान, भारतरत्न पुरस्कार देण्यात आला


२. (१९२५) प्रसिद्ध गायिका शोभा गुर्टू यांचा जन्म

त्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्या शास्त्रीय संगीतात पारंगत तर होत्याच, परंतु उपशास्त्रीय संगीत गायकीवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. त्यांचे अभिनय अंगाने ठुमरी गायन रसिकप्रिय होते. लोकांनी त्यांना 'ठुमरी सम्राज्ञी' म्हणून नावाजले होते

३. (१९४१) प्रसिद्ध गायक जगजीत सिंह यांचा जन्म

ते ख्यातनाम भारतीय गझलगायक, संगीतकार होते. इ.स. १९७० आणि इ.स. १९८० च्या दशकात गायिका पत्‍नी चित्रा सिंह यांच्यासमवेत जगजीत यांनी केलेल्या गझलांच्या संगीत ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय ठरल्या. त्यांना गझलसम्राट या नावाने ओळखले जाऊ लागले. पंजाबी, हिंदी, उर्दू, बंगाली, गुजराती, सिंधी आणि नेपाळी या भाषांमधून जगजीतसिंह यांनी गायन केले

४. (१९९९) आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्धन यांचे निधन

डॉ. इंदूताई पटवर्धन या समाजाने दूर अंध:कारात लोटलेल्या कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलवणार्‍या, डुडुळगाव येथील आनंदग्रामच्या संस्थापिका, ज्येष्ठ समाजसेविका होत्या. इंदूताई पटवर्धन यांनी १६ व्या वर्षी गांधीजींच्या चळवळीस वाहून घेतले. माँटेसरी शिक्षणक्रम पूर्ण करून त्या शिक्षिका बनल्या. पुढे ब्रिटिश इंडियन रेड क्रॉस आणि सेंट जॉन अ‍ॅम्ब्युलन्सच्या कामामध्ये दाखल झाल्या

कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी काम सुरू केले ते १९६५ मध्ये. आळंदी जवळच्या ‘आनंदग्राम’ येथे १९७० मध्ये त्यांनी स्थलांतर केले. उला लेडी हाइड पार्कर, राधा रमणजी अशा व्यक्तींच्या सक्रिय साह्यामुळे ‘आनंदग्राम’ला सध्याचे विशाल स्वरूप आल्याचा त्या कृतज्ञतेने उल्लेख करतात. १९६५ मध्ये महाराष्ट्र शासनाचा भिक्षा प्रतिबंध कायदा अमलात आला, तेव्हा ८० रुग्णांसह फुगेवाडी येथे त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी काम सुरू केले. ‘आनंदग्राम’ची उभारणी कुष्ठरोग्यांनीच केली

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर