दिनविशेष ४ फेब्रुवारी
दिनविशेष
दि. ४ फेब्रुवारी
* जागतिक कर्करोग दिन
जगभरात दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. जागतिक कर्करोग दिनाची सुरुवात २००० मध्ये पॅरिस येथे झालेल्या कर्करोगाविरुद्धच्या पहिल्या जागतिक शिखर परिषदेत करण्यात आली. बदलत्या जीवनशैलीतून कॅन्सरचा विळखा आता आबालवृद्धांमध्ये जडताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्याबद्दल सर्वांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे
१. (१६७०) ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उदगार काढले ते सरदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे निधन
ते शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सुभेदार व शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी होते. तानाजी यांनी महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्त्वाच्या घडामोडीत सहभाग घेतला होता
२. (१९२२) शास्त्रीय गायक, स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म
भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिणी भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या चीजा हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही, विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले
३. (१९७१) महाराष्ट्रीयन, लोकशाहीवादी, चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा जन्म
त्यांनी आपल्या जीवनात लोकशाही मुल्यांचा पुरस्कार केला आहे. विविध सामाजिक विषयांवर त्यांनी रोखठोक भाष्य केले आहे
४. (२००२) चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक भगवान आबाजी पालव ऊर्फ मास्टर भगवान यांचे निधन
मास्टर भगवान आधी स्टंट चित्रपटांत कामे करायचे. पुढे त्यांनी स्वतःची चित्रपट कंपनी काढली. भगवान यांनी एकूण २९३ चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांनी ३४ चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे, २ चित्रपटांची पटकथा लिहिली आहे आणि एका चित्रपटाची निर्मिती केली आहे. बऱ्याच चित्रपटांतील त्यांनी भूमिका केलेल्या पात्राचे नाव भगवान किंवा भगवानदादा असे
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment