दिनविशेष ०१ मार्च

दिनविशेष 

०१ मार्च

* जागतिक नागरी संरक्षण दिन

जागतिक नागरी संरक्षण दिन दरवर्षी १ मार्च रोजी साजरा केला जातो. जगातील नागरी संरक्षण, नागरी सुरक्षेबाबत लोकांना जागरुक करणे हा त्याचा उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय नागरी संरक्षण संघटना (ICDO) द्वारे १९९० मध्ये जागतिक नागरी संरक्षण दिनाचा समावेश करण्यात आला. तेव्हापासून १ मार्च रोजी जागतिक नागरी संरक्षण दिन साजरा केला जातो

इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर सिव्हिल डिफेन्स (ICDO) ही एक आंतरशासकीय संस्था आहे ज्याचा उद्देश नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींच्या प्रसंगी लोकसंख्येचे संरक्षण करणे आणि त्यांना मदत करणे, मालमत्ता आणि पर्यावरणाचे संरक्षण सुनिश्चित करणार्‍या संरचनेच्या राज्यांद्वारे विकासात योगदान देणे आहे. तसेच या दिवशी विविध राष्ट्रीय कार्यक्रम या दिवशी आयोजित केले जातात


* आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिन

कचरा वेचक महिलांनी लघुउद्योगाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा एक नवाच धडा समाजापुढे ठेवला आहे. समाजात अत्यंत हीन व तुच्छतेचे काम करणाऱ्या म्हणून कचरा वेचक महिलांकडे बघण्याची दृष्टी आहे. मात्र त्यांना सन्मानपूर्वक काम व स्थान मिळावे म्हणून काही वर्षापासून स्वयंसेवी संस्था कार्य करीत आहेत. १ मार्च १९९२ ला कोलबिंया येथे ११ कचरा वेचक महिलांची हत्या करण्यात आली होती. त्यांना श्रद्धांजली म्हणून १ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिन म्हणून साजरा केला जातो

१. (१९८९) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ वसंतदादा पाटील यांचे निधन

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा पाटील होत. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी असा त्यांचा जीवन प्रवास होत

२. (२००३) कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री गौरी देशपांडे यांचे निधन

त्या मराठीतील लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार देशपांडे यांनी हाताळले. मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी-मराठी व मराठी-इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले. देशपांडेंच्या आई लेखिका, संशोधक इरावती कर्वे होत्या. दिनकर धोंडो ऊर्फ डी. डी. कर्वे हे त्यांचे वडील होते. जाई निंबकर या इंग्रजी व मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते महर्षी धोंडो केशव कर्वे हे डी. डी. कर्वे यांचे वडील व देशपांडे यांचे आजोबा होते. ’समाजस्वास्थ्य’ या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक र. धों. कर्वे हे देशपांडेंचे यांचे काका होते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर