दिनविशेष २९ फेब्रुवारी

दिनविशेष 

दि. २९ फेब्रुवारी

* आजचा दिवस वर्षातील उर्वरित ३६५ दिवसांपेक्षा वेगळा आहे. याचं कारण म्हणजे २९ फेब्रुवारीचा दिवस चार वर्षांनी एकदाच येतो. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी २९ दिवस असतात. लीप वर्षात ३६५ ऐवजी ३६६ दिवस असतात. लीप वर्ष हे सम अंकी असते. उदा. २०२०, २०२४, २०२८


१. (१९०४) प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना रुक्मिणीदेवी अ‍रुंडेल यांचा जन्म

भरतनाट्यम्‌च्या पुनरुज्जीवनात रुक्मिणीदेवींचा मोठाच हातभार होता. त्यांनी खेडोपाडी जाऊन अनेक नृत्यशिक्षकांकडून या नृत्यप्रकारासंबंधी माहिती गोळा केली. ज्या काळी समाजात नृत्यास प्रतिष्ठा नव्हती त्या काळी त्यांच्यासारख्या सुसंस्कृत उच्च कुटुंबातील स्त्रीने त्या क्षेत्रात पदार्पण करावे, ही घटनाच अपूर्व होती. शरीराची लवचिकता, लयीविषयीची जाण व हालचालींतील आकर्षकता ह्यांमुळे त्यांच्या नृत्यांना वैशिष्ट्यपूर्णता लाभली. नृत्याकडे त्यांनी श्रद्धेने व बुद्धिवादी दृष्टीने पाहिले. शास्त्रोक्त संगीत, नृत्यनाट्ये ह्यांतही त्यांनी विशेष प्रावीण्य संपादिले होते. कुमारसंभव, शाकुंतल, तसेच कुट्राल कुरवंजि, कण्णपर कुरवंजि,श्यामा, आंडाळ, रामायण (६ भाग) इ. नाट्ये, नृत्यनाट्ये त्यांनी सादर केली व त्यांच्या संगीतरचनाही केल्या. त्यांनी अड्यार येथे ‘कलाक्षेत्र’ ह्या संस्थेची स्थापना केली (१९३६) होती. थिऑसॉफीतही त्यांना रुची होती. ‘बेझंट थिऑसॉफिकल हायस्कूल’च्या संस्थापनेस (१९३४) व संवर्धनास त्यांनी सक्रिय मदत केली होती

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर