दिनविशेष २७ फेब्रुवारी

दिनविशेष

दि. २७ फेब्रुवारी 

* मराठी भाषा गौरव दिन

२७ फेब्रुवारी प्रत्येक मराठी माणसासाठी गौरवाचा दिवस म्हणजेच, 'मराठी भाषा गौरव दिन'. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने दि. २१ जानेवारी २०१३ रोजी घेतला


१. (१९१२) ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म

ते मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदीप्यमान रत्‍न केले जाते. वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो

२. (१९२६) मराठी व हिंदी लेखिका ज्योत्स्‍ना देवधर यांचा जन्म

ज्योत्स्ना देवधर यांनी ‘अंतरा’ या हिंदी कथासंग्रहापासून त्यांच्या साहित्य लेखनास सुरुवात केली. ‘घर गंगेच्या काठी’ या पहिल्याच मराठी कादंबरीने त्यांना अफाट लोकप्रियता लाभली

ज्योत्स्ना देवधर यांचे लेखन स्त्रीवादी आणि वास्तववादी होते. त्यांच्या कथांतून आपल्याला स्त्रीच्या वाट्याला येणारी दुःखे, वेदना, त्यांच्या जीवनातील कारुण्य यांचे चित्रण पहायला मिळते

त्यांनी लिहिलेले 'पंडिता रमाबाईंचे चरित्र' हे चरित्र लिखाणाचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या ‘घर गंगेच्या काठी’, ‘कल्याणी’ आणि ‘पडझड’ या कादंबऱ्या पुणे विद्यापीठ, कोल्हापूर विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ आणि इस्लामिया विद्यापीठ या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात होत्या. त्यांच्या विविध कथांचे कन्नड, तेलगू, तमीळ, मल्याळम, आसामी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत अनुवाद झाले आहेत

ज्योत्स्ना देवधर या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या ज्येष्ठ सदस्या होत्या. इ.स. १९६० मध्ये आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर त्या निर्मात्या म्हणून रुजू झाल्या अणि ‘गृहिणी’ या कार्यक्रमाचा भाग असलेल्या ‘माजघरातील गप्पा’ याद्वारे त्या घरांघरांमध्ये पोहोचल्या

३. (१९३१) थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचे निधन

ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. राम प्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (एच.आर.ए.) या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एच.एस.आर.ए.) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली. त्यांना भगत सिंग यांचे गुरू मानले जाते

४. (१९५६) भारतीय वकील आणि राजकारणी गणेश वासुदेव मावळणकर यांचे निधन

प्रथम लोकसभा निवडणुकीनंतर बनलेल्या पहिल्या लोकसभेचे ते अध्यक्ष होते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर