दिनविशेष १५ फेब्रुवारी

दिनविशेष

दि. १५ फेब्रुवारी

१. (१८६९) ऊर्दू शायर मिर्झा ग़ालिब यांचे निधन

ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. साहित्य निर्मिती करताना केवळ चौकट मोडून चालत नाही. त्यात तितकी ताकदही असावी लागते. गालिबने परंपरेला नावीन्याची झालर लावली. अभिजात सौंदर्याची बूज राखायला शिकवले. घराण्यातच सैनिकी पार्श्वभूमी असल्याने गालिब यांच्यामध्ये बंडखोरीचे बीज होते

२. (१९४९) दलित साहित्यिक 'गोलपिठा'कार नामदेव ढसाळ यांचा जन्म

ते मराठी कवी, विचारवंत, दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे लेखक आणि बौद्ध-दलित चळवळीतील नेते होते. महानगरीय जीवनावर लिहिणारे आणि बोली भाषेत लेखन करणारे ते मराठीतले एक महत्त्वाचे लेखक होते. दलित समाजात आपल्या कविताच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली. त्यांची गोलपिठा ही साहित्य कृती फार गाजली. त्यामुळे त्यांना गोलपिठा ही उपाधी देण्यात आली


३. (२०१९) माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन

त्यांनी मुंबई हायकोर्ट, सुप्रीम हायकोर्टात न्यायाधीश म्हणून काम पाहिलं. न्यायमूर्ती म्हणून पी. बी. सावंत यांनी अनेक ऐतिहासिक निकाल दिले. सेवानिवृत्त झाल्यानंतरही सामाजिक कार्यक्रमांमध्ये ते सक्रीय होते तसंच आग्रहानं भूमिका मांडत होते. वर्ल्ड प्रेस काऊन्सिल आणि प्रेस काऊन्सिल ऑफ़ इंडियाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काही काळ काम पाहिले

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर