दिनविशेष १४ फेब्रुवारी
दिनविशेष
दि. १४ फेब्रुवारी
* व्हॅलेंटाईन डे
हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी भेट म्हणून लाल गुलाब देण्यात येतो. गेले काही वर्ष ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी हा संपूर्ण आठवडा वेगवेगळ्या प्रकारचे दिवस म्हणून साजरे करण्यात येतात. हा दिवस सेंट व्हॅलेन्टाईन नावाच्या ख्रिश्चन संतांच्या नावाने जगभरात साजरा करण्यात येतो
१. (१९१६) कवयित्री संजीवनी मराठे यांचा जन्म
या एक कविता गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी कवयित्री होत्या
२. (१९२५) भारताचे माजी केंद्रीय मंत्री व वनराई या संस्थेचे संस्थापक मोहन धारिया यांचा जन्म
मोहन धारिया यांनी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी 'लोकसेना' नावाची संस्था सुरू केली. आपल्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर त्यांनी शेकडो तरुणांना संघटित केले. शिवाय वेगवेगळ्या संघटनांना एकत्र आणून मोहन धारिया यांनी पुण्यात 'नॅशनल लेबर सेंटर'ची स्थापना केली
मोहन धारिया यांनी इ.स. १९८३ च्या सुमारास 'वनराई' या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे उद्दिष्ट लोकसहभागातून विकास साधणे हे होते. या संस्थेतर्फे सुमारे २.५ कोटीपेक्षा जास्त रोपांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. ते अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत होते व तरुणांचे प्रेरणास्थान होते. भारतातील सुमारे १७.५ हेक्टर जमिनांच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी सरकारशी सतत पाठपुरावा केला. लोकसहभागातून त्यांनी जवळपास तीन लाख 'वनराई बंधारे' बांधले. त्यांद्वारे, जमिनीत पाण्याचे पुनर्भरण शक्य झाले. त्यामुळे अनेक गावांना टॅंकरने पाणीपुरवढा करायची गरज उरली नाही. हे कार्य करताना त्यांचावेगवेगळ्या सामाजिक्संस्थांशी घनिष्ट संबंध आला. साधना, भारतीय शिक्षण संस्था, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनसेवा अशा विविध संस्थांचे ते विश्वस्त होते
३. (१९३३) आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित करणाऱ्या हिंदी चित्रपट अभिनेत्री मधुबाला यांचा जन्म
त्यांनी ऐतिहासिक चित्रपट मुगल-ए-आज़म मध्ये अनारकली हे पात्र साकारले होते. त्या चित्रपटाला अभूतपूर्व प्रतिसाद, प्रसिद्धी आणि भरघोस नफा मिळाला होता
४. (२०१९) जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ ला दहशतवादी हल्ला. या घटनेत सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment