दिनविशेष १३ फेब्रुवारी
दिनविशेष
दि. १३ फेब्रुवारी
* जागतिक रेडीओ दिन
१३ फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक रेडिओ दिन' म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने २०१३ मध्ये या दिवसाला मान्यता दिली आहे. १८९५ मध्ये रेडिओचा शोध लागला आणि नव्या क्रांतीचा उदय झाला. त्यावेळी त्याला 'फादर ऑफ रेडिओ' अस म्हटले जाऊ लागलं. अस असले तरी भारतात रेडिओ येण्यासाठी तब्बल ३३ वर्षे लागली. इंग्रजांनी २३ जुलै १९२७ रोजी पहिल्यांदा रेडिओ आणला. त्यावेळी मुंबई आणि कलकत्ता या दोन शहरातच तो ऐकायला मिळायचा. तर १९२० साली रेडिओचे व्यावसायिक युग सुरू झाले
१९२० ते १९५० हा रेडिओचा सर्वाधिक चांगला किंवा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. या काळात वेगवेगळे तंत्रज्ञान विकसित झाले. पुढे १९५५ नंतर तर रेडिओ अनेकांच्या पसंतीस उतरले कारण, त्यावर असणारे वेगवेगळे कार्यक्रम लोकप्रिय झाले. लोक रेडिओपासून दूर राहणे पसंत करत नव्हते. त्यात 'सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम' म्हणजे लोकांचा जीव की प्राण झाला होता. टिव्ही येण्याआधी मनोरंजन आणि माहिती आदानप्रदान करण्यात रेडिओ एकमेव साधन म्हणून लोकप्रिय होते
१. (१८७९) भारतातील प्रथम महिला राज्यपाल, नाइटिंगेल ऑफ इंडियन साँग या पदवीने सन्मानित, प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांचा जन्म
त्या एक राजकीय कार्यकर्त्या आणि कवयित्री होत्या. नागरी हक्क, महिला मुक्ती आणि साम्राज्यवाद विरोधी विचारांच्या समर्थक, वसाहतवादी राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात त्या एक महत्त्वाची व्यक्ती होत्या. नायडू यांच्या कवितांमुळे त्यांना 'भारताची नाइटिंगेल' किंवा 'भारत कोकिळा' ही उपाधी महात्मा गांधी यांच्याकडून मिळाली. यामागे त्यांच्या कवितेतील रंग, प्रतिमा आणि गीतात्मक गुणवत्ता ही कारणे होती
२. (१८९४) छत्रपती शिवाजी महाराजांची अधिकृत प्रतिमा म्हणून आज सर्वत्र ज्या छायाचित्राला मान्यता मिळाली आहे ते आपल्या परदेश दौर्यात हस्तगत करणारे इतिहास संशोधक, इतिहासकार वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेंद्रे यांचा जन्म
इतिहास संशोधन आणि इतिहास लेखन ह्या क्षेत्रा मध्ये ज्यांनी अनन्य साधारण असे काम केले अशा दिग्गजांच्या यादीतील एक क्रियाशील व्यक्ती म्हणजे इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे होय. वेगवेगळ्या विषयांची हाताळणी सविस्तरपणे करण्यात म्हणजेच वैविध्य आणि वैपुल्य या दोन्ही आघाड्यांवर वा. सी. बेंद्रे ह्यांची कामगिरी अतुलनीय आहे. त्यांनी छत्रपती संभाजी यांच्यावर विपुल संशोधनात्मक लेखन केले
३. (१९०१) गायक नट लक्ष्मण बापुजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर यांचे निधन
लक्ष्मण बापुजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर हे मराठी रंगभूमीवरचे गायकनट होते. फारसे न शिकलेले भाऊराव, बडोद्याला पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात नोकरीला होते. मात्र साधे कारकून असलेल्या भाऊरावांना, बडोद्यातील माणसे गायक म्हणून ओळखत
४. (१९११) लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचा जन्म
त्यांच्या क्रांतिकारी रचनानांमध्ये इंकलाबी रसिक भावांच्या मेळासाठी त्यांना ओळखले जाते. त्यांना नोबेल पारितोषिकासाठी पण नामांकित करण्यात आले होते. तुरुंगवासात त्यांनी लिहिलेली कविता 'ज़िन्दान-नामा' हिला प्रचंड पसंती मिळाली होती
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment