दिनविशेष ११ फेब्रुवारी
दिनविशेष
दि. ११ फेब्रुवारी
१. (१९४२) प्रसिद्ध मराठी कादंबरीकार गौरी देशपांडे यांचा जन्म
कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन अशा अनेक माध्यमांतून त्यांनी मुक्तसंचार केला. अरेबियन नाईट्सचे सगळे खंड त्यांनी मराठी भाषेत आणले
मराठी बरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी-मराठी व मराठी-इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले. देशपांडेंच्या आई लेखिका, संशोधक इरावती कर्वे होत्या. दिनकर धोंडो ऊर्फ डी. डी. कर्वे हे त्यांचे वडील होते. जाई निंबकर या इंग्रजी व मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते महर्षी धोंडो केशव कर्वे हे डी. डी. कर्वे यांचे वडील व देशपांडे यांचे आजोबा होते. ’समाजस्वास्थ्य’ या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक र. धों. कर्वे हे देशपांडेंचे यांचे काका होते
गौरी देशपांडे यांच्या साहित्याची सविस्तर सूची कथा गौरीची या पुस्तकात वाचावयास मिळते. संपादकीय मनोगतात वि. म. गीताली म्हणतात, 'गौरीनं माणसाच्या देहाकडे स्त्रीदेह आणि पुरुषदेह या द्वैतभावनेनं न बघता निखळ मानवी देह म्हणून बघितलं जावं असं म्हणत स्त्रीच्याच देहाभोवती बांधलेले नैतिकतेचे निकष तोडायला सुरुवात केली.' १९६८ साली प्रकाशित झालेला 'Beetween Births' हा काव्यसंग्रह देशपांडेंचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होतं. त्याच मृत्यू होईपर्यंत त्या लिखाण करत होत्या
२. (१९४२) भारतीय उद्योजक जमनालाल बजाज यांचे निधन
ते बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक, स्वातंत्र्यसेनानी व गांधीवादी कार्यकर्ते होते
३. (१९७७) भारताचे पाचवे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचे निधन
४. (१९९३) भारतीय चित्रपट दिग्दर्शक कमाल अमरोही यांचे निधन
ते भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते व पटकथालेखक होते. तसेच हे प्रथितयश उर्दू व हिंदी कवीसुद्धा होते. यांनी हिंदी चित्रपटांचे पटकथालेखन, दिग्दर्शन केले
#vishalinc5 #satara #सातारादिनविशेष
दि. ११ फेब्रुवारी
१. (१९४२) प्रसिद्ध मराठी कादंबरीकार गौरी देशपांडे यांचा जन्म
कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन अशा अनेक माध्यमांतून त्यांनी मुक्तसंचार केला. अरेबियन नाईट्सचे सगळे खंड त्यांनी मराठी भाषेत आणले
मराठी बरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले. देशपांडेंच्या आई लेखिका, संशोधक इरावती कर्वे होत्या. दिनकर धोंडो ऊर्फ डी. डी. कर्वे हे त्यांचे वडील होते. जाई निंबकर या इंग्रजी व मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते महर्षी धोंडो केशव कर्वे हे डी. डी. कर्वे यांचे वडील व देशपांडे यांचे आजोबा होते. ’समाजस्वास्थ्य’ या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक र. धों. कर्वे हे देशपांडेंचे यांचे काका होते
गौरी देशपांडे यांच्या साहित्याची सविस्तर सूची कथा गौरीची या पुस्तकात वाचावयास मिळते. संपादकीय मनोगतात वि. म. गीताली म्हणतात, 'गौरीनं माणसाच्या देहाकडे स्त्रीदेह आणि पुरुषदेह या द्वैतभावनेनं न बघता निखळ मानवी देह म्हणून बघितलं जावं असं म्हणत स्त्रीच्याच देहाभोवती बांधलेले नैतिकतेचे निकष तोडायला सुरुवात केली.' १९६८ साली प्रकाशित झालेला 'Beetween Births' हा काव्यसंग्रह देशपांडेंचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होतं. त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्या लिखाण करत होत्या
२. (१९४२) भारतीय उद्योजक जमनालाल बजाज यांचे निधन
ते बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक, स्वातंत्र्यसेनानी व गांधीवादी कार्यकर्ते होते
३. (१९७७) भारताचे पाचवे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचे निधन
४. (१९९३) भारतीय चित्रपट दिग्दर्शक कमाल अमरोही यांचे निधन
ते भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते व पटकथालेखक होते. तसेच हे प्रथितयश उर्दू व हिंदी कवीसुद्धा होते. यांनी हिंदी चित्रपटांचे पटकथालेखन, दिग्दर्शन केले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment