दिनविशेष १० जानेवारी

दिनविशेष

दि. १० जानेवारी

* जागतिक हिंदी दिन

१० जानेवारी हा जागतिक हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात १४ सप्टेंबरला हिंदी दिन साजरा केला जात असला तरी जगभरात तो १० जानेवारीला साजरा केला जातो

१. (१७६०) 'बचेंगें तो और भी लढेंगे' अशी घोषणा देणारे पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर दत्ताजी शिंदे यांचे निधन

२. (१८९६) स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ यांचा जन्म

ते मराठी राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, लेखक व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक होते. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विधी, इतिहास इ. विषयांवरील व इतर ललित स्वरूपाची त्यांची ग्रंथनिर्मिती सुमारे पंचवीसहून अधिक आहे. विविध विषयांवरील त्यांची पुस्तके विचारप्रवर्तक आहेत. 'ग्यानबाचे अर्थशास्त्र' हे १९४३ मधील पुस्तक अर्थशास्त्राची सुबोध मराठीत चर्चा करणारा उल्लेखनीय ग्रंथ होय


३. (१९००) महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचा जन्म

ते महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते, त्यांनी २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले

४. (१९५०) आदिवासींसाठी आपले जीवन समर्पण करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील नजूबाई गावित यांचा जन्म

त्या आदिवासी, भूमिहीन, शेतकरी, धरणग्रस्त इत्यादींच्या लढ्यात सहभाग घेणाऱ्या आदिवासी समाजातील कार्यकर्त्या आहेत. त्यांनी 'श्रमिक महिला संघ' स्थापन केला आहे. आदिवासी महिलांचे आर्थिक जीवन व आरोग्य सुधारण्यासाठी त्यांनी आवश्यक ते प्रयत्न केले

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर