दिनविशेष ९ जानेवारी
दिनविशेष
दि. ०९ जानेवारी
* प्रवास भारतीय दिवस
महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिका देशातून मायदेशात (सन १९१५) परतल्याच्या दिनाचे औचित्य साधून सन २००३ पासून दरवर्षी ९ जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरातील भारतीय प्रवाशांचे नेटवर्क तयार करणे व गुंतवणूक वाढवणे हा या दिनाचा उद्देश आहे
१. (१८३१) भारतातील पहिल्या मुस्लीम शिक्षिका फतिमा शेख यांचा जन्म
फातिमा शेख या एक भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक होत्या. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या त्या सहकारी होत्या. शेख या आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकांपैकी एक असून त्यांनी फुले यांच्या शाळेत दलित, वंचित, गरीब मुलांना शिक्षण देण्याचे काम केले
२. (१९२७) चिपको आंदोलनाचे नेते सुंदरलाल बहुगुणा यांचा जन्म
महात्मा गांधींच्या तत्त्वांना अनुसरून सुंदरलाल बहुगुणा यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध लोकांना एकत्र केले. त्यासाठी त्यांनी हिमालयातील जंगले आणि आणि पर्वतांमधून ४ हजार सातशे किलो मीटरचा पायी प्रवास केला. त्यावेळी मोठ्या प्रकल्पांमुळे हिमालयातील नाजुक पर्यावरणावर होणारे गंभीर दुष्परिणाम त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे खेड्यांतील लोकांच्या जीवनावर होणारा परिणामही त्यांनी जवळून अनुभवला. यातूनच १९७३ साली चिपको आंदोलनाची सुरुवात झाली. हिमालयाच्या पायथ्याच्या प्रदेशात असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशाने मोठ्या प्रमाणात तोडली जाणार होती. त्या विरोधात चंडीप्रसाद भट्ट आणि सुंदरलाल बहुगुणा यांनी मोठे आंदोलन उभे केले. जंगले व झाडे वाचवण्यासाठी सुंदरलाल बहुगुणांनी दुर्गम भागांतील खेड्यापाड्यांतील जनतेला झाडे तोडण्यासाठी आलेल्या कामगारांना थोपवण्यासाठी झाडांना मिठी मारून चिपकण्याची कल्पना दिली
३. (१९३४) प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायक महेंद्र कपूर यांचा जन्म
'मेरे देश की धरती सोना उगले हिरे मोती' या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला होता. दादा कोंडके यांच्या अनेक चित्रपटांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केले होते
४. (२०००) भारताची प्रसिद्ध धावपटू हिमा दास यांचा जन्म
हिमा दास ही एक भारतीय धावपटू आहे. २०१८ मध्ये फिनलँडमध्ये वर्ल्ड ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी झालेल्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी ती पहिली भारतीय आहे
५. (२०२३) मराठी लेखक, वृत्तनिवेदक, चरित्रकार आणि अभिनेते विश्वास मेहेंदळे यांचे निधन
सातारा येथून प्रकाशित होणाऱ्या ऐक्य दैनिकाचे ते संपादक होते. विश्वास मेहेंदळे हे मराठी नाट्यसृष्टीचे भाष्यकार होते. ’मला भेटलेली माणसे’ हा एकपात्री कार्यक्रमही ते सादर करत. हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय होता
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment