दिनविशेष ८ जानेवारी
दिनविशेष
दि. ०८ जानेवारी
१. (१८९५) भारतीय कामगार चळवळीचे प्रणेते रामचंद्र रुईकर यांचा जन्म
कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी लढा दिला व अनेकवेळा तुरुंगवासही भाेगला. देशभरात अनेक कामगार संघटना निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे
२. (१९०९) ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिल्या लेखिका आशापूर्णा देवी यांचा जन्म
त्या बांग्ला भाषेत लिखाण करणाऱ्या एक साहित्यकार होत्या. आशापूर्णा देवी यांना प्रथम प्रतिश्रुति या कादंबरीसाठी इ.स. १९७६ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता
३. (१९७३) सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक ना. भि. परुळेकर उर्फ नानासाहेब परुळेकर यांचे निधन
ते 'सकाळ'चे संस्थापक-संपादक होते. पत्रकारितेतील कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरविले होते. 'निरोप घेता' नावाचे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे
४. (१९९५) समाजवादी विचारवंत मधु लिमये यांचे निधन
ते मराठी-भारतीय राजकारणी होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात, तसेच गोवा मुक्तिसंग्रामात सहभाग घेतला
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment