१३. रेल्वे विभागात मागील काही काळात बदल झालेल्या गोष्टी
🔴 रेल्वे विभागात मागील काही काळात बदल झालेल्या गोष्टी
१. रेल्वे उशिरा धावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वंदे भारत सारख्या गाड्या चालू झाल्यामुळे इतर गाड्यांना वंदे भारत पुढे जाऊ देण्यासाठी वाट करून द्यावी लागते. नवीन गाड्या आणल्या तरी रेल्वे ट्रॅक तेवढेच असल्यामुळे असे प्रकार घडतात.
२. रेल्वे प्रवास महाग झाला आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय भारतीय यातून प्रवास करू शकत नाहीत. रेल्वे प्रवास मागील काही वर्षात महाग झाला आहे. रेल्वे प्रवास हा स्वस्त प्रवास म्हणून ओळखला जात होता पण आता तो स्वस्त राहिला नाही. नवीन गाड्या आणल्या, चांगल्या सुविधा दिल्या म्हणून प्रवास महाग आहे.
३. पण त्यातून किती प्रवासी धावतात. एकूण प्रवाशी संख्येच्या २ ते ३ टक्केच प्रवासी अशा गाड्यातून धावतात. इतर रेल्वे गाड्यांमधून मध्यमवर्गीय भारतीय प्रवास करतात. पण त्यामधून प्रवास करणे आता अवघड झाले आहे. त्यातील बऱ्याच गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. आहेत त्या गाड्या वेळेवर धावत नाहीत. रद्द होतात किंवा त्यामध्ये जागा नसते. अशा अनेक अडचणी लोकांना येतात.
४. रेल्वेच्या गाड्यांमधील जनरल डबे मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले आहेत. त्याऐवजी आरक्षित, एसी डबे वाढविण्यात आलेले आहेत. त्यामुळे वाढलेल्या प्रवाशी लोकांना एवढ्या कमी डब्यांमधून प्रवास करणे शक्य होत नाही. (उदा. कोयना एक्स्प्रेस मधील आता जनरल डब्यांची संख्या कमी करून आरक्षित, एसी डबे वाढवले आहेत)
५. रेल्वे विभागात गेल्या काही वर्षात लाखो लोक निवृत्त झाले आहेत. मात्र त्याजागी लोकांची भरती करण्यात आली नाही. त्यामुळे रेल्वेची, त्याच्या इतर विभागांची देखभाल, दुरूस्ती योग्य प्रकारे करणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे अस्वच्छता, अपघातांना लोकांना सामोरे जावे लागते.
सरकार याकडे दुर्लक्ष करून रेल्वेला अडचणीत आणत आहे का...? एकीकडे वंदे भारतचा उदो उदो करायचा आणि इकडे पूर्णपणे डोळेझाक करायची ही फसवणूक नाही का...?
एक माहिती पूर्ण व्हिडीयो. 👇
https://youtu.be/QyPUVWTmmxM?si=CcFJRfhNlFagLNTQ
#रेल्वे #Railway
- विशाल पवार
दि. ६ जानेवारी २०२४
Comments
Post a Comment