दिनविशेष २९ जानेवारी

दिनविशेष

दि. २९ जानेवारी 

१. (१७३७) ब्रिटिश-अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक थॉमस पेन यांचा जन्म

ते एक ब्रिटिश-अमेरिकन लेखक तसेच मानवी हक्कांच्या बाबत भाष्य करणारे जगाच्या इतिहासातील पहिले विचारवंत होते. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते. मानवी अधिकारांचे शास्त्रशुद्ध विवेचन त्यांनी 'मानवी हक्क' या ग्रंथात केले आहे. स्वातंत्र्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांना या ग्रंथाने प्रेरणा दिली

३. (१९६२) जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांचा जन्म

त्या बंगळूरच्या जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी लंकेश पत्रिकें ह्या साप्ताहिकामध्ये संपादक म्हणून काम केले, जे त्यांचे वडील पी. लंकेश यांनी सुरू केले होते. त्यानंतर त्या गौरी लंकेश पत्रिके ह्या नावाने स्वतःचे साप्ताहिक चालवले. वृत्तपत्र स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या म्हणून गौरी यांना ओळखले जाते. गौरी या उजव्या विचारसरणीमधील हिंदुत्वाच्या राजकारणाच्या कट्टर समीक्षक होत्या


३. (२०१९) भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे कामगार नेते, पत्रकार आणि संसदपटू जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन

ते कामगार नेते, पत्रकार आणि संसदपटू होते. जॉर्ज फर्नांडिस भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते होते. ते जनता दल (संयुक्त) पक्षातील एक ज्येष्ठ होते. केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर