दिनविशेष २८ जानेवारी
दिनविशेष
दि. २८ जानेवारी
१. (१८६५) स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म
ते पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी योगदान दिले. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली
२. (१८९९) स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचा जन्म
३. (१९३७) चित्रपट व भावगीत गायिका सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूर यांचा जन्म
या गायिका असून त्यांनी हिंदी, मराठी चित्रपटगीतांबरोबरच अनेक मराठी भावगीतेही गायली आहेत. गुजराती, बंगाली, पंजाबी, ओडिसी या भाषांतही त्यांनी गाणी गायिलेली आहेत
४. (१९९७) आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे यांचे निधन
ते प्रसिद्ध गणिती शास्त्रज्ञ होते. 'इंडियन ॲग्रिकल्चरल स्टॅटिस्टिक्स रिसर्च इन्स्टिट्यूट' या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा हातभार होता
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment