दिनविशेष २७ जानेवारी
दिनविशेष
दि. २७ जानेवारी
१. (१९०१) मराठी लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा जन्म
अस्पृश्यता निवारण, विधवांचे पुनर्विवाह, अशा सामाजिक प्रश्नांवर जोशी यांनी काम केले. महात्मा गांधी यांच्या अस्पृश्यता निवारण चळवळीत त्यांचे वैचारिक योगदान होते
२. (१९०९) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर यांचा जन्म
त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वितीय पत्नी व व्यवसायाने एमबीबीएस डॉक्टर होत्या. आंबेडकरानुयायी त्यांना आईची उपमा देत त्यांना माई किंवा माईसाहेब नावाने संबोधत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधान लिखाणाच्या काळात, हिंदू कोड बिल आणि त्यांच्या धर्मांतराच्या निर्णयाच्या वेळी, माईसाहेब बाबासाहेबांच्या साथीला होत्या
२. (१९२६) भारताचे १३ वे लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचा जन्म
त्यांच्या सेनाध्यक्षपदाच्या कारकीर्दीतच अमृतसर (पंजाब) येथील सुवर्णमंदिरातून खलिस्तानवादी सशस्त्र अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन ब्ल्यू स्टार म्हणून ओळखली जाणारी सैनिकी कारवाई १९८४ साली करण्यात आली
४. (२०२२) प्रसिद्ध साहित्यिक, कलावंत, तसेच व्यसनमुक्तीसाठी आयुष्य वेचलेले मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे निधन
ते एक सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी लेखक होते. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत त्यांनी पुण्यात 'मुक्तांगण' हे व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले. तसेच पश्चिम भारताच्या पातळीवर प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र सुरू केले तसेच महिलांसाठी स्वतंत्र विभाग निर्माण केला. मुक्तांगणाची गोष्ठ आणि गर्द ऐसी ही दोन पुस्तके त्यांनी मुक्तांगण आणि तेथील रुग्णांचे अनुभव यावर लिहिली आहेत. या सामाजिक कार्यासाठी त्यांना २०१३ मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. २०१० मध्ये अवचट यांच्या 'सृष्टीत गोष्टीत' या कथासंग्रहाला मराठी बाल साहित्य पुरस्कार श्रेणीत साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment