दिनविशेष ३ जानेवारी
दिनविशेष
दि. ३ जानेवारी
* महिला शिक्षक दिन
* महिला मुक्ती दिन
१. (१८३१) पहिल्या स्त्री शिक्षका, कवियत्री आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म
सावित्रीबाई फुले या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी इ.स. १८४८ मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती
महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. त्यांनी जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. सावित्रीबाई या लेखिका देखील होत्या. त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले
२. (१९३१) लेखक, विचारवंत व इतिहाससंशोधक य. दि. फडके यांचा जन्म
ते एक मराठी चरित्रलेखक, इतिहास संशोधक होते
३. (२०००) स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, गांधीवादी कार्यकर्त्या डॉ. सुशीला नायर यांचे निधन
४. (२००२) इस्रोचे माजी अध्यक्ष सतीश धवन यांचे निधन
भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमच्या वाटचालीत महत्त्वाचे योगदान होते. ते भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्यानंतर ISRO (Indian Space Research Organisation) चे १९७२ साली अध्यक्ष झाले. त्यांना भारतातील प्रायोगिक fluid dynamicsच्या संशोधनाचे जनक मानले जाते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment