दिनविशेष १९ जानेवारी

दिनविशेष

दि. १९ जानेवारी

१. (१८८६) हिंदुस्थानी शास्त्रीय गायक रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचा जन्म

रामभाऊंच्या कुटुंबात संगीताची विशेष पार्श्वभूमी नसताना त्यांनी संगीतामध्ये रुची वाढविली आणि उस्ताद अब्दुल करीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाला प्रारंभ केला. तेथील अभ्यास पूर्ण केल्यानंतर रामभाऊ एका नाटक कंपनीत सामील झाले आणि थोड्याच काळात मराठी रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. नारायण श्रीपाद राजहंस यांना ज्याप्रमाणे लोक बालगंधर्व म्हणून ओळखू लागले, त्याचप्रमाणे रामभाऊ कुंदगोळकरांना लोक सवाई गंधर्व या नावाने ओळखू लागले. त्यांनी गायलेली मराठी नाट्यसंगीतातील काही पदे अजरामर झाली आहेत

व्यक्तीच्या गुणवत्तेचा खरा कस अनेक ठिकाणी लागतो, त्यातील सर्वाधिक उच्च दर्जाची कसोटी म्हणजे ती व्यक्ती इतरांमध्ये असलेल्या गुणवत्तेला कसे फुलविते, त्यांना कसा वाव देते व मार्गदर्शन करते. सवाई गंधर्व या मूल्याधारित कसोटीवर सर्वाधिक खरे उतरले आहेत. किराणा घराण्याची परंपरा यशस्वीरीत्या पुढे नेणाऱ्या आणि अधिकच उजळविणाऱ्या त्यांच्या शिष्यपरंपरेतील गायक/गायिकाच नव्हे तर संपूर्ण भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्र आज त्यांचे ऋणी आहे. सवाई गंधर्वांच्या शिष्यांपैकी काही नावे म्हणजे भीमसेन जोशी, बसवराज राजगुरू, गंगूबाई हनगळ, वगैरे. यापैकी पंडित भीमसेन जोशी यांनी पुण्याला त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला


२. (१८९२) विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचा जन्म

ते विनोदी साहित्यासाठी प्रसिद्ध असलेले मराठी लेखक होते. पाली भाषेचा त्यांचा विशेष अभ्यास होता. चिं. वि. जोशी यांचे बहुतांशी लेखन हे विनोदी वाङ्मय असले तरी ते व्यावहारिक जीवनात ते धीरगंभीर प्रवृत्तीचे गृहस्थ होते

३. (१९०५) भारतीय तत्त्वज्ञानी देवेंद्रनाथ टागोर यांचे निधन

ते भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ होते. ते ब्रह्मो समाजाच्या संस्थापकांपैकी एक होते

४. (१९६०) मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे यांचे निधन

ते मराठी, भारतीय चित्रपट निर्माते होते. त्यांना मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक मानले जाते. त्यांनी निर्मिती, दिग्दर्शन आणि चित्रपट वितरण क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून आणले

वयाच्या २१ व्या वर्षी तोरणेंना स्वत:च चित्रपट तयार करावा, अशी कल्पना सुचली. त्यांनी ही कल्पना त्यांचे मित्र नानाभाई चित्रे या आपल्या मित्राला सांगितली. चित्रे तेव्हा ॲडव्होकेट इंडिया या सायंदैनिकाचे मुख्य व्यवस्थापक होते. त्यांनी तोरणेंच्या चित्रपटाला आर्थिक साह्य केले. मात्र, बॉर्न अँड शेफर्ड कंपनीकडे चित्रपट बनविण्यासाठी लागणारा कॅमेरा आहे हे चित्रे यांना कळाले, तेव्हा ते स्वत:च त्यांच्याकडे गेले आणि त्यांना हजार रुपयांच्या बदल्यात विल्यम्सन कॅमेरा, चित्रपटांसाठी लागणारी रिळे आणि छायाचित्रकार देण्यासाठी राजी केले. अखेर मुंबईच्या मंगलदास वाडीत १९०९ साली चित्रीकरणाला सुरुवात झाली

भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक गोष्टी प्रथम करण्याचा मान तोरणेंकडे जातो. मेहबूब खान (मेहबूब कलाघर), करदार, भालजी पेंढारकर, विश्राम बेडेकर, आर. एस. चौधरी, सी रामचंद्र, जयश्री, रत्नमाला, आलम आरामधील झुबेदा यांसारख्या अनेक गुणी कलाकारांना तोरणेंनी प्रथम संधी दिली

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर