दिनविशेष १६ जानेवारी

दिनविशेष

दि. १६ जानेवारी

१. (१६८१) छत्रपती संभाजी महाराज यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला


२. (१९०९) समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन

ते महाराष्ट्रातील समाजसुधारक होते, तसेच ते अर्थशास्त्रज्ञ व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे ते अध्यक्षही होते. १८८५ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. रानडे यांना आधुनिक भारताच्या इतिहासात महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीत महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षणाचा प्रसार व्हावा, स्त्रियांनाही शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्या. त्यांनी शिक्षण, समाजसेवा, राजकारण तसेच आर्थिक बाबतीत अमूल्य कार्य केले

३. भारतीय संगीतकार, संगीत दिग्दर्शक आणि गीतलेखक ओ. पी. नय्यर यांचा जन्म

त्यांच्या संगीतात एक ह्रिदम होता, एक ठेका होता, जोश होता, उल्हास होता, जीवनाचं सार चैतन्यच जणू संगीतात सामावलं होता. त्यांनी प्रस्थापित संगीताची चाकोरी बदलली. तोवर भारतीय संगीत म्हणजे मनाला मंत्रमुग्ध करणारा अनुभव येत असताना ओ. पी. नय्यर यांनी रसिकांच्या मनावर धुंदी तर घातलीच शिवाय साऱ्या शरीराला नाचायला/डोलायला शिकवलं. त्याचं संगीत एक झपाटून टाकणार चेटूक होत. आज पन्नास वर्षाचा कालखंड उलटून गेला तरीही 'बहुत शुक्रिया बडी मेहरबानी', 'मेरी जिंदगी में हुजूर आप आये', 'आई ये मेहरबान बैठीये जाने जा', 'पुकारता चला हूँ मैं गली गली बहार की', कजरा मुहोब्बत वाला आन्खियो मे ऐसा डाला' या गाण्याची गोडी तसूभरही कमी झाली नाही. उलट रसिकांच्या दिलातील ओपीच्या संगीताचा 'गहिरा', 'बादल' आणखीनच 'दिवाना' होत गेला

४. (१९५४) चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे निधन

बाबुराव पेंटर यांचे मूळ नाव बाबुराव कृष्णराव मेस्त्री असे होते. चित्रकला व शिल्पकला यांचे धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. सुरुवातीला ते तैलचित्रे काढत. गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबूराव पेंटर यांची कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली

१९३० च्या सुमारास त्यांनी तयार केलेली सिनेमाची पोस्टर्स पाहून जे. जे. स्कूलचे तत्कालीन संचालक सालोमन यांनी त्यांचा सत्कार केला. जे. जे. स्कूलमध्ये काहीही शिक्षण घेतलेले नसताना देखील रंगांच्या शुद्धतेविषयी व मिश्रणाविषयी बरीच माहिती त्यांना होती. चित्रकलेतील त्यांचे तंत्रकौशल्य म्हणजे रंगछटांचे वजन ते थोडेदेखील ढासळू देत नसत. त्यातूनच ते एक कल्पनारम्य, उत्कृष्ट अशी प्रतिमा निर्माण करत. त्यांनी तयार केलेल्या महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या शिल्पकृती आजही कोल्हापूरमध्ये बघायला मिळतात. कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ‘कलामहर्षी’ या पदवीने गौरवण्यात आले

५. (१९९७) कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांचे निधन

दत्ता सामंत (डॉ. दत्तात्रय सामंत) उर्फ डॉक्टर साहेब हे एक भारतीय राजकारणी आणि गिरणी कामगार चळवळीचे नेते होते, ते मुंबई शहरातील २ ते ३ लाख कापड गिरणी कामगारांचे नेते म्हणुन प्रसिद्ध होते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर