दिनविशेष १४ जानेवारी

दिनविशेष

दि. १४ जानेवारी

* भूगोल दिन

१४ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. सी डी देशमुख हे भूगोल विषयातील अत्यंत जाणकार व्यक्ती मानले जातात. त्यांचे भूगोलाचे ज्ञान अफलातून होते त्यामुळे त्यांना भूगोल महर्षी असे म्हटले जाते. भूगोल विषयात त्यांनी केलेले अतुलनीय कार्य लक्षात घेऊन त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो

१. (१८८२) संततिनियमन आणि लैंगिक शिक्षणावर काम करणारे कृतीशील विचारवंत रघुनाथ धोंडो कर्वे यांचा जन्म

ते गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते. हे धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र होत. महाराष्टात संततिनियमन या नासक्या समजल्या जाणाऱ्या गोष्टीला कुठलीही सामजिक मान्यता नव्हती. अशा काळामध्ये सामाजिक सुधारणांचा आग्रह धरून समाजामध्ये संततिनियमन होणे आवश्यक आहे, आणि त्यासंबंधी कायदा करून त्याचा उपयोग केला जावा, अशा प्रकारचे मत र. धों. कर्वे यांनी मांडले. 'समाजस्वास्थ्य' या नावाने त्यांनी मासिक सुरू करून परिवर्तनाला दिशा देण्याचा प्रयत्न केला 


२. (१८९६) भारताचे माजी अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी. डी. देशमुख यांचा जन्म

ते मराठी अर्थशास्त्रज्ञ होते. ते भारतीय रिझर्व बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते. सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाबाई देशमुख या चिंतामणराव देशमुखांच्या पत्‍नी होत्या. भारत सरकारातील पंतप्रधान नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते

३. (१९०५) हिंदी व मराठी चित्रपट अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा जन्म

इ.स. १९३२ सालच्या अयोध्येचा राजा या मराठीतील पहिल्या बोलपटात प्रमुख भूमिकांपैकी राणी तारामतीची भूमिका त्यांनी केली होती. भरत मिलाप (इ.स. १९४२) चित्रपटात कैकेयी, तर मुघल-ए-आझम (इ.स. १९६०) चित्रपटात जोधाबाई, इत्यादी यांनी रंगवलेल्या भूमिकादेखील विशेष गाजल्या. सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी मराठी व हिंदी भाषांतील अनेक चित्रपट व नाटकांतून भूमिका केल्या

४. (१९२६) ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांचा जन्म

त्या बंगाली लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. इ.स. २००२ मध्ये साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना ऑफिसर ऑफ आर्टस अँड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर केला गेला. याशिवाय भारतातही त्यांना साहित्य अकादमी ने सन्मानित केले आहे. त्यांना इ.स. १९९६ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर