दिनविशेष ११ जानेवारी

दिनविशेष

दि. ११ जानेवारी

१. (१८५८) प्रसिद्ध हिंदी साहित्यिक श्रीधर पाठक यांचा जन्म

श्रीधर पाठकांची मौलिक काव्यरचना जगत सचाई सार (१८८७) ही असून त्यात जीवनकडे पाहण्याचा गंभीर व कर्मप्रधान दृष्टिकोन परिणामकारकपणे प्रकट झाला आहे. पाठकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे निसर्गाविषयीचे त्यांचे अकृत्रिम आकर्षण व त्याकडे पाहण्याचा त्यांचा अभिनव दृष्टिकोन होय

निसर्गसौंदर्य, देशभक्ती व समाजसुधारणा हे विषय त्यांच्या काव्यात प्रामुख्याने आले आहेत. हिंदी खडी बोलीचा काव्यात उपयोग करण्यास त्यांनी विशेष हातभार लावला, हे त्यांचे महत्त्वाचे कार्य म्हणता येईल. ते वृत्तीने स्वच्छंदतावादी असले, तरी त्या वेळच्या परंपरावादी विचारांचा पगडाही त्यांच्या मनावर खूप होता. निसर्गप्रेम, खडी बोलीचा उपयोग आणि स्वच्छांदतावादी वृत्ती या तीन वैशिष्ट्यांमुळे ते भारतेंदु युग, द्विवेदी युग व पुढचे छायावादी युग यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानले जातात

२. (१८९८) ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक वि. स. खांडेकर यांचा जन्म

खांडेकरांचे लेखन १९१९ पासून प्रकाशित होऊ लागले. त्यांनी ‘कुमार’ ह्या टोपण नावाने कविता व ‘आदर्श’ ह्या टोपण नावाने विनोदी लेख प्रसिद्ध केले. खांडेकरांचे लेखन बहुविध स्वरूपाचे असून त्यात १५ कादंबऱ्या, ३१ लघुकथासंग्रह, १० लघुनिबंधसंग्रह, ६ रूपककथासंग्रह, १ नाटक ह्यांशिवाय काही चरित्रात्मक / समीक्षात्मक ग्रंथ व संकीर्ण लेखसंग्रह ह्यांचा स‌मावेश होतो. तसेच त्यांनी मराठी, हिंदी व तेलुगू चित्रपटांसाठी एकूण १८ पटकथा लिहिलेल्या आहेत

१९६१ मध्ये त्यांच्या ययाति ह्या कादंबरीस महाराष्ट्र स‌रकारने कादंबरी विभागाचे पहिले पारितोषिक दिले. ह्या कादंबरीस ह्याच वर्षी साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. ह्या कादंबरीत आधुनिक जीवनाला ग्रासून टाकणाऱ्या भोगवादावरील भेदक भाष्य आढळते. १९४१ मध्ये सोलापूर येथे झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. १९५७ साली मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांस मिळाले. १९६८ मध्ये भारत सरकारने त्यांस ‘पद्मभूषण’ हा किताब दिला. १९७० मध्ये त्यांस साहित्य अकादमीचे फेलो नेमण्यात आले


३. (१९६६) भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे निधन

ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५ सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले

४. (२००८) मराठी लेखक यशवंत दिनकर तथा य. दि. फडके यांचे निधन

यशवंत दिनकर फडके महाराष्ट्राच्या आधुनिक कालखंडाचे इतिहासकार, चरित्रलेखक, विचारवंत. य. दि. फडके यांची स्वतंत्र व संपादित अशी एकूण ६२ पुस्तके इंग्रजीत आहेत. त्यांचे बहुतांश लेखन विचावंतांच्या चरित्रांचा व कार्याचा तसेच आधुनिक महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासाचा वेध घेणारे आहे

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर