दिनविशेष २२ डिसेंबर
दिनविशेष
दि. २२ डिसेंबर
* राष्ट्रीय गणित दिन
थोर गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिन भारतात राष्ट्रीय गणित दिन म्हणून दरवर्षी २२ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. २०१२ मध्ये केंद्र सरकारने अशी घोषणा केली होती
हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश गणिताचे मानवतेच्या विकासातील महत्त्व याबद्दल लोकांमध्ये जागृती करणे, गणिताच्या महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण करणे हा आहे. या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणिताच्या स्पर्धा घेतल्या जातात. विद्यार्थ्यांना गणिताच्या क्षेत्रात संशोधन करण्यास प्रवृत्त केले जाते
१. (१८८७) थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म
त्यांची गणित विषयातील योगदान अद्वितीय आहे. त्यामुळे त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. ’पार्टिशन फंक्शन’च्या रचनेवर त्यांनी मूलभूत संशोधन केले
२. (१९४५) रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा ’पठ्ठे बापूराव’ यांचे निधन
बापूरावांचे स्वतःचे काव्य, योग्य साथ, पहाडी आवाज आणि लावणीतील शृंगाराने तमाशा बदलला. त्यातून श्रीधरची वाहवा होता होता `पठ्ठेबापूराव ` म्हणून ते प्रसिद्धीला आले. १९०८-०९ साली छत्रपती शाहू महाराजांसमोर ’मिठाराणी'चा वग पठ्ठे बापूरावांनी सादर केला. पठ्ठे बापूरावांच्या जीवनावर त्यांच्याच नावाचा मराठी चित्रपट इ.स. १९५० मध्ये निघाला. राजा नेने दिग्दर्शक होते. लावण्ययवती हा पठ्ठे बापूराव यांच्या आयुष्यावरील दुसरा चित्रपट
३. (१९७५) संगीतकार वसंत देसाई यांचे निधन
ते मराठी, तसेच अन्य भारतीय चित्रपटांस संगीत देणारे मराठी संगीतकार होते. त्यांनी दिलेल्या चालींनुळे त्यांचे नाव भारतात आणि परदेशांत अजरामर झाले आहे
इ.स. १९४३ मध्ये वसंत देसाई यांनी राजकमल कलामंदिराच्या शकुंतला या पहिल्या चित्रपटाला स्वतंत्रपणे संगीत दिले. त्यांची ही संगीत कारकीर्द पुढे तीस वर्षे चालूच राहिली. जवळजवळ ६५ हिंदी-मराठी चित्रपटांचे ते संगीत दिग्दर्शक होते. चित्रपट नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले. त्यांच्या ’ए मालिक तेरे बंदे हम’ या गीताला पाकिस्तानात राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला. १९६२ च्या चीन युद्धाच्या वेळचे 'जिंकू किंवा मरू’ या ग.दि. माडगुळकर यांच्या गीताला त्यांनीच चाल लावली होती
४. (२००२) प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते दिलीप कुळकर्णी यांचे निधन
परिंदा, विनाशक आणि सर्वसाक्षी, थोडासा रूमानी हो जाए, मेरे बीवी की शादी या हिंदी चित्रपटांमध्ये तसेच चौकट राजा, आई, विनायक या मराठी चित्रपटांमध्ये देखील दिलीप कुळकर्णी यांनी काम केलं
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment