दिनविशेष ९ डिसेंबर
दिनविशेष
दि. ९ डिसेंबर
१. (१८७८) कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचा जन्म
अण्णासाहेब लठ्ठे हे एक भारतीय राजकारणी, समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ तसेच सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर चळवळीचे नेते होते. इ.स. १९२५ मध्ये लठ्ठे यांची कोल्हापूर राज्याचे छत्रपती राजाराम तिसरे यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर दिवाण रघुनाथराव सबनीस यांच्या निवृत्तीनंतर त्यांची कोल्हापूरच्या दिवाणपदी नियुक्ती झाली
२. (१९४२) हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे निधन
डॉ. द्वारकानाथ कोटणीस हे मराठी-भारतीय डॉक्टर होते. दुसऱ्या महायुद्धात जपानने चीनवर आक्रमण केलेले असताना डॉ. कोटणीस चीनला गेले होते. तेथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्षे रुग्णसेवा केली. तेथेच डिसेंबर ९, १९४२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जीवनावर 'डॉक्टर कोटनीस की अमर कहानी' नावाचा एक हिंदी चित्रपट व्ही.शांताराम यांनी काढला होता
३. (१९४६) भारतीय राजकारणातील प्रभावशाली नेत्या, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी यांचा जन्म
त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, या सर्वात जास्त काळ सत्तेत असणाऱ्या बलाढ्य राजकीय पक्षाच्या अध्यक्षा होत्या. १९९८ साली सोनिया गांधींनी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले. २०१७ सालापर्यंत २२ वर्षे इतका काळ त्यांनी अध्यक्षपद सांभाळले
४. (१९९७) कन्नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते आणि विचारवंत के. शिवराम कारंथ यांचे निधन
ते ज्ञानपीठ पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कन्नड भाषेतील साहित्यकार होते. कर्नाटकातील यक्षगान या लोककलेचे पुनरुज्जीवन कारंतांनी केले. त्यांनी लिहिलेल्या ४७ कादंबऱ्या हे केवळ आधुनिक कन्नड साहित्यासच दिलेले योगदानच नाही, तर भारतीय साहित्यविश्वास दिलेली समृद्धी आहे
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment