दिनविशेष ८ डिसेंबर

दिनविशेष

दि. ८ डिसेंबर

१. (१८९७) हिंदी कवी पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ नवीन यांचा जन्म

२. (१९००) जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक, पद्मविभूषण उदय शंकर यांचा जन्म

३. (१९८५) सार्क परिषदेची स्थापना

दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना (South Asian Association for Regional Cooperation (SAARC); संक्षिप्त नाव: सार्क) ही दक्षिण आशिया खंडामधील ८ देशांची एक आर्थिक व राजकीय सहयोग संघटना आहे. अमेरिका व चीन खालोखाल सार्क सदस्य राष्ट्रांची एकत्रित अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असून जगातील लोकसंख्येच्या २१ टक्के लोक सार्क क्षेत्रामध्ये राहतात. भारत हा सार्कमधील सर्वात बलाढ्य देश आहे

सार्क संघटनेची कल्पना १९५० च्या दशकात Asian Relations Conference मध्ये मूळ धरू लागली. १९७० च्या दशकात बांगलादेश, भूतान, भारत, मालदिव, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या देशांनी एकत्रपणे व्यापार व सहकार हेतू एका संस्थेची गरज भासू लागली. दक्षिण आशियामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगती करण्याच्या उद्देशाने तसेच सांस्कृतिक विकास व विकसनशील देशाबरोबर सहकार्य करण्यासाठी सार्क संघटना उभारण्यात आली


#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर