दिनविशेष ६ डिसेंबर

दिनविशेष

दि. ६ डिसेंबर

* महापरिनिर्वाण दिन

* (१९५६) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन

हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो

भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात


१. (१९१६) मराठी गायक, नाट्य-चित्रपट अभिनेते ’गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार यांचा जन्म

जयराम आणि जयमाला शिलेदार यांनी ’मराठी रंगभूमी' ही संस्था स्थापन करून, संगीत नाटकांची परंपरा पुनरूज्जीवित तर केलीच, पण पुन्हा संगीत रंगभूमीच्या वैभवी परंपरेचे दर्शनही संगीत रसिकांना घडवले

वि. भा. देशपांडे यांनी दीड तासात आटोपेल इतके संक्षिप्‍त करून दिलेल्या संगीत सौभद्र आणि संगीत रामराज्य वियोग या नाटकांचे यशस्वी प्रयोग जयराम शिलेदारांनी दिल्ली आकाशवाणीवरून सादर केले

२. (१९२३) मराठी लेखक व पटकथाकार वसंत सबनीस यांचा जन्म

ते मराठी साहित्यिक, नाटककार होते. लेखक, विनोदी नाटककार, ग्रामीण कथेला विनोदी बाज देणारे कथाकार व पटकथालेखक म्हणून वसंत सबनीस महाराष्ट्रात गाजले होते. चिल्लरखुर्दा (१९६०), भारूड (१९६२), मिरवणूक (१९६५), पंगत (१९७८), आमची मेली पुरुषाची जात (२००१) हे प्रसिद्घ लेखसंग्रह होत. त्यांच्या कथांवरून 'एकटा जीव सदाशिव', 'सोंगाड्या' हे दादा कोंडके निर्मित चित्रपट बनले. 'अशी ही बनवाबनवी', 'एकापेक्षा एक', गंमत जंमत', 'नवरी मिळे नवऱ्याला', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी' ह्या सचिन पिळगावकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटांच्या कथा-पटकथा सबनीसांच्या होत्या

३. (१९७६) स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील यांचे निधन

ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते. क्रांतिसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे क्रांतिकारक मानले जातात. त्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने सांगली सातारा या परिसरामध्ये होते

नाना पाटील यांच्यावरती प्रारंभीच्या काळात सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता. पुढील काळात ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीस आव्हान देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक मार्गाचा पुरस्कार केला. साताऱ्यातील प्रतिसरकारच्या स्थापनेत त्यांचा वाटा महत्त्वाचा होता. नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये प्रतिसरकारची स्थापना करून महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीला मोठे योगदान दिले. भूमिगत चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. प्रतिसरकारची स्थापना झाल्यावर ग्रामीण भागात ब्रिटिशांचे अस्तित्व नाममात्र राहिले. नाना पाटील यांनी युवकांची संघटना स्थापन करून इंग्रजांपुढे जबरदस्त आव्हान निर्माण केले. प्रती सरकारचे नेते या नात्याने त्यांनी केलेल्या कार्यामुळेच त्यांना क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाऊ लागले. महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीच्या भूमिगत कार्यकर्त्यांमध्ये नाना पाटलांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. या काळामध्ये महाराष्ट्रातील सातारा, सांगली या परिसरात नाना पाटलांची ब्रिटिशांवर एक मोठी दहशद निर्माण झाली होती. प्रतिसरकार अथवा 'पत्री सरकार' म्हणून या काळात ते ओळखले गेले

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर