दिनविशेष १ जानेवारी
दिनविशेष
दि. ०१ जानेवारी
* नवीन वर्षारंभ
१. (१८१८) भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृत्वाखाली फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या २५,००० सैन्याचा पराभव केला. या प्रित्यार्थ १ जानेवारी हा दिवस भीमा कोरेगाव शौर्यदिन म्हणून साजरा केला जातो
२. (१८४८) महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली
महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा १८४८ मध्ये सुरु केली. त्यांनी पुण्यात व साताऱ्यात एकूण १८ शाळा सुरु केल्या. महात्मा फुले यांचे म्हणणे होते की समाजाला शहाणे करायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही
३. (१९३६) कवी, विनोदकार, कथाकार, कादंबरीकार, ललितलेखक राजा राजवाडे यांचा जन्म
विनोदी लेखक म्हणून अधिक लोकप्रिय असलेल्या राजा राजवाडे यांनी कथा, कादंबरी, कविता, बालसाहित्य, ललितलेख इत्यादी वाङ्मय-प्रकारही लीलया हाताळले
एकाच वेळी कथा, कादंबरी, विनोदी लेख, विनोदी कादंबर्या, स्तंभलेखन, ललित-गद्य, व्यक्तिचित्रे, बालसाहित्य, कविता असे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन करणार्या राजवाड्यांनी चित्रपटकथा नाटक व लोकनाट्य यांसारखे प्रयोगशील प्रकारही हाताळले आहेत. राजवाड्यांनी लहानमोठ्या अशा जवळपास ७६ पुस्तकांचे लेखन चाळीस वर्षांत केले. उच्च मध्यमवर्गीय व मध्यमवर्गीय जीवनाचे स्त्री-पुरुषांच्या जीवनातील ताणतणाव, नोकरी करणार्या विवाहित व अविवाहित स्त्रियांचे प्रश्न, त्यांची नोकरीत होणारी कुचंबणा, प्रेमी युगुलांचे प्रणयाराधन, बलात्कारित व फसवणूक झालेल्या असाहाय्य अबलांची दुःखे, सिने व नाट्यसृष्टीतील स्त्री-पुरुष कलावंतांच्या जीवनातील संघर्ष इत्यादींचे चित्रण राजवाडे यांच्या लेखनात प्रामुख्याने आढळते
त्यांनी विविध विषयांवर चटपटीत स्वरूपाचे रंजनपर लेखन केले असले तरी लक्षवेधक लेखनही केले आहे. ‘दोस्ताना’ (व्यक्तिचित्रे), ‘डॉग व्हॅन’ (कथा, १९८९), ‘घर आमचं कोकणातलं’ आणि ‘माणसं आमच्या कोकणातली’ (ललित लेख, १९९० व १९९८) अशा काही पुस्तकांचा व लेखांचा उल्लेख या संदर्भात करता येतो
४. (१९५०) प्रसिद्ध उर्दु शायर राहत इंदोरी यांचा जन्म
राहत इंदोरी यांनी आपल्या शायरीने लाखो लोकांची मने जिंकली. सरकारच्या हुकुमशाही विरोधात त्यांनी आवाज उठवला. लोकांचा प्रखर आवाज ते बनले
त्यांचा प्रसिद्ध शेर...
जो आज साहिब-इ-मसनद हैं कल नहीं होंगे
किराएदार हैं जाती मकान थोड़ी है
सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में
किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है.
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment