दिनविशेष ३० डिसेंबर

दिनविशेष

दि. ३० डिसेंबर

१. (१८६५) नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक व कवी रुडयार्ड किपलिंग यांचा जन्म

त्यांचे जंगलबुक हे पुस्तक फार गाजले

२. (१९७१) भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार तथा अंतराळ संशोधनाचे पितामह डॉ. विक्रम साराभाई यांचे निधन

ते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात

विक्रम साराभाई यांनी जागतिक कीर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरुवात केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डाॅ. साराभाई यांच्या प्रयत्नातूनच उभी राहिली. भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखिल डाॅ. साराभाई यांनीच सुरू केली. अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन (ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग ॲन्ड टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखील त्यांनी उभारली

३. (१९७५) प्रसिद्ध हिंदी कवी, कथाकार, गजलकार दुष्यंत कुमार यांचे निधन

हिंदी कवी आणि गजलकार म्हणून ते प्रसिद्ध होते. दुष्यंत कुमार हे अत्यंत मनमौजी व्यक्ती होते. ते सुरुवातीच्या काळात दुष्यंत कुमार परदेशी या नावाने लेखन करायचे. १९७५ मध्ये त्यांचा 'धूप' हा गजलसंग्रह प्रकाशित झाला. त्यामधील गजलांना खूप लोकप्रियता मिळाली. त्यामधील शेर-शायऱ्या लोकांना तोंडपाठ होत्या. त्याकाळातील वृत्तपत्र आणि वाचक 'धूप'ला तरुणांची गीता म्हणायचे

दुष्यंत कुमार एक असे साहित्यिक आहेत ज्यांनी गजल या साहित्यप्रकाराला सामन्य माणसाशी जोडण्याचे काम केले. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये त्यांनी सामन्य माणसाला होणारे त्रास, त्याच्या मनातील विचार, देशाची दुर्दशा याविषयी कवितेच्या, गजलेच्या माध्यमातून लेखन केले

देशाची दुर्दशा पाहून कवी शांत बसू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे होते. याबाबत दुष्यंत कुमार लिहितात की, 'मुझमें बसते हैं करोडो लोग, चुप रहूं कैसे? हर गजल अब सल्तनत के नाम बयान है।'

मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए। 
ही त्यांची गझल फार प्रसिद्ध आहे

४. (२०१५) कवी, नाटककार पद्मविभूषण मंगेश पाडगावकर यांचे निधन

सलाम या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. साठहून अधिक वर्षांच्या लेखन कारकिर्दीत पाडगावकरांनी इतर भाषांतील साहित्यकृतींचे अनुवादही भरपूर केले. ‘थॉमस पेनचे राजनैतिक निबंध’ हा त्यांनी केलेला अनुवाद १९५७ साली प्रकाशित झाला होता आणि २००९-१० मध्ये ‘बायबल’चा अनुवाद प्रकाशित झाला. या दीर्घ कालावधीत त्यांनी विविध विषयांवरच्या पंचवीसहून अधिक पुस्तकांचा अनुवाद केला. निबंध, कथा, कविता, कादंबरी, नाटक, इतिहास, चरित्र, आत्मचरित्र असे सर्व साहित्यप्रकार आणि विविध विषय यांत आहेत

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं अश्या सुंदर कवितांच्या माध्यमातून जीवनावर प्रेम करण्याचा सकारात्मक संदेश त्यांनी दिला

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर