दिनविशेष २९ डिसेंबर
दिनविशेष
दि. २९ डिसेंबर
१. (१९४२) चित्रपट अभिनेते, निर्माते, सुपरस्टार राजेश खन्ना यांचा जन्म
राजेश खन्ना यांनी एकेकाळी संपूर्ण चित्रपटसृष्टी व्यापून टाकली होती. दो रास्ते, आराधना, हाथी मेरे साथी चित्रपटांमधून त्यांनी ज्या वेगवेगळ्या भूमिका केल्या, त्या लोकांना आवडल्या. त्यांच्या चित्रपटांच्या कथा, संगीत, गाणी हे सर्वच अप्रतिम असायचे. आनंद व अमर प्रेम हे त्यांचे विशेष उल्लेखनीय चित्रपट
२. (१९४७) मराठी कवी अशोक नायगावकर यांचा जन्म
महाराष्ट्रात लेखक घडवण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे असे ते सांगतात. उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन करणारे कवी अशी त्यांची ओळख आहे. वाचनाने संस्कृती सुधारते, वाचन वाढवा, त्यामुळे तुम्ही समृद्ध व्हाल, असे ते म्हणतात. २०१२ मध्ये दापोली येथे झालेल्या १४ व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अशोक नायगावकर होते. अशोक नायगावकर ह्यांनी प्रेम कविता, ग्रामीण कविता, पर्यावरण जाणीवेच्या कविता, सामाजिक, राजकीय कविता अशा अनेक प्रकारच्या कविता लिहिल्या आहेत
३. (१९७१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांचे निधन
ते भारतीय राजकारणी, समाजसेवक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या चळवळीत प्रगल्भ, विश्वसनीय व्यक्तिमत्व म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड होय. गायकवाड आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष होते. तसेच पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार), लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्य (खासदार) म्हणून त्यांनी कार्य केले
४. (२०२२) ब्राझिलचे जगप्रसिद्ध फुटबॉल खेळाडू पेले यांचे निधन
खेळाच्या अभ्यासकांच्या मते पेले त्या काळातील महान खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखले गेले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment