दिनविशेष २८ डिसेंबर
दिनविशेष
दि. २८ डिसेंबर
१. (१८८५) मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (Indian National Congress) स्थापना
२८ डिसेंबर १८८५ रोजी 'इंडियन नॅशनल काँग्रेस' म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सरकार व जनता यांच्यामध्ये एक संवादात्मक स्वरूपाची वाटचाल सुरू झाली. काँग्रेस याचा अर्थ संघटना असा होतो. धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या आधारे संपूर्ण देशाच्या विकासाचा आराखडा काँग्रेस सरकारने तयार केला
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या घटनेनुसार, एक संसदीय लोकशाही असलेले समाजवादी राष्ट्र जिथे संधी तसेच राजकीय, आर्थिक आणि सामाजिक हक्कांत समानता व जागतिक शांततेचे उद्दिष्ट आहे, अशा भारतीय नागरिकांचे आणि भारतीय प्रशासनाची शांततापूर्वक आणि घटनात्मक मार्गाने प्रगती व कल्याण करणे हा सदर पक्षाचा उद्देश आहे
२. (१८९९) कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर यांचा जन्म
ते मराठी लेखक, कवी, पत्रकार व समीक्षक होते. आपल्या वाङ्मयीन कारकिर्दीच्या आरंभ काळात माडखोलकरांनी काही संस्कृत-मराठी कविता केल्या होत्या. रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. त्या मंडळाच्या १९२४ साली प्रकाशित झालेल्या ’उषा’ ह्या काव्यसंग्रहात त्यांच्या काही कविता आहेत
३. (१९२६) हुतात्मा शिरीषकुमार यांचा जन्म
१९४२ मध्ये महात्मा गांधींनी ब्रिटीशांविरूद्ध भारत छोडो आंदोलन सुरू केले. शिरीषकुमार नंदुरबारमध्ये सरकारविरुद्ध आंदोलन करीत होते. मंगळ बाजार परिसरात पोलिसांनी बॅरीकेड उभारले होते. जसजशी मिरवणूक गाठली त्याप्रमाणे पोलीसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज लावला. शिरीषकुमारकडे तिरंगा, भारतीय राष्ट्रध्वज होता. त्यांच्या लाठीचा आरोप मिरवणूक थांबवू शकले नाही तेव्हा पोलिसांनी गोळीबार केला. या घटनेत शिरीशकुमार यांचे निधन झाले
४. (२०००) तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे यांचे निधन
हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. ते महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून ख्यातकीर्त होते. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी मराठी भाषकांना पाश्चात्य तत्त्वज्ञान परंपरेचा मुक्तपणे परिचय करून दिला. 'पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास', 'तत्त्वज्ञानातील समस्या' ही भाषांतरे, 'नवभारत (मासिक)' मधील त्यांचे लेख आणि विश्वकोशातील पाश्चात्य तत्त्वज्ञानविषयक व तत्त्ववेत्यांच्या नोंदी पहाता रेगे यांच्या कार्याची, त्यांच्या तत्त्वज्ञान मराठीत आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाची याची खात्री पटेल. भारतीय दर्शने, ग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञान व इतर अनुषंगिक परंपरांचा व्यासंग ही त्यांची वैशिष्ट्ये होती
मार्च १९९६ मध्ये मुंबई महानगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने मराठी भाषा – स्थिती आणि भवितव्य हया विषयावर त्यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी मराठीतील बौद्धिक परंपरेविषयी व त्या अनुषंगाने मराठी भाषा व तिच्या भवितव्याविषयी मर्मभेदक भाष्य केले आहे. ज्ञानभाषा म्हणून मराठी स्थानापन्न होण्यात नेमका कोणता अडथळा होता याची उत्तम मीमांसा त्यांच्या भाषणात आहे
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment