दिनविशेष २६ डिसेंबर
दिनविशेष
दि. २६ डिसेंबर
१. (१९१४) कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचा जन्म
ते एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर , महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचे आश्रम त्यांनी सुरू केले. ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटत होते. याशिवाय 'वन्य जीवन संरक्षण', 'नर्मदा बचाओ आंदोलन' अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. बाबा आमटे यांना आधुनिक भारताचे 'संत' या नावाने गौरवले आहे
२. (१९४१) भारतीय रंगभूमीवरील गुणी व बंडखोर अभिनेत्री लालन सारंग यांचा जन्म
'सखाराम बाईंडर' नाटकातील चंपा च्या व्यक्तिरेखेने मराठी रंगभूमीवर वादळ आणणाऱ्या बंडखोर अभिनेत्री लालन सारंग यांनी कमला, गिधाडे, जंगली कबुतर, सूर्यास्त, कालचक्र या नाटकाबरोबरच सामना चित्रपटातही भूमिका केली. त्यांच्या सर्व भूमिका विशेष गाजल्या. लालन सारंग 'मी आणि माझ्या भूमिका' हा कार्यक्रम करीत असत
३. (१९४८) समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांचा जन्म
प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. दि. २३ डिसेंबर १९७३ पासून ते, त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात, तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात
४. (१९८९) व्यंगचित्रकार व लेखक, भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक केशवा तथा के. शंकर पिल्ले यांचे निधन
ते एक भारतीय व्यंगचित्रकार होते. त्यांना भारतातील राजकीय व्यंगचित्राचे जनक मानले जाते. १९४८ मध्ये त्यांनी शंकर्स वीकली ह्या साप्ताहिकाची स्थापना केली. शंकर्स वीकलीने अबू अब्राहम, रंगा आणि कुट्टी सारखे व्यंगचित्रकार देखील तयार केले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment