दिनविशेष १९ डिसेंबर

दिनविशेष

दि. १९ डिसेंबर

* गोवा मुक्ती दिवस

भारत स्वतंत्र झाल्यानंतर पोर्तुगीजही आपोआप गोव्यातून काढता पाय घेतील असा अंदाज होता. पण तसं झालं नाही. भारताने गोवा आणि दमण दीव स्वतंत्र केले. गोवा या राज्याला दिनांक १९ डिसेंबर १९६१ रोजी पोर्तुगीजांपासून मुक्ती मिळाली म्हणून या दिवशी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो

१. (१९२७) रेल्वेतील (काकोरी कट) लुटीच्या घटनेला जबाबदार धरून राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली

‘काकोरी कटाच्या’ घटनेमुळे जनतेच्या मनावर त्यांचे नाव कोरले गेले. धाडसी ट्रेन-लूटीच्या या घटनेने उत्तर भारतातील क्रांतिकारी चळवळीने दिशा बदलली

रामप्रसाद बिस्मिल यांचे ‘सरफरोशी की तमन्ना’ हे गीत जनमानसामध्ये प्रसिद्ध होते


२. (१९३४) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा जन्म

त्यांनी इ.स. २००७ ते इ.स. २०१२ मध्ये राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळली होती

प्रतिभाताई पाटील यांनी आपल्या जीवनाची सुरुवात समाजकार्याने केली व नंतर गांधीवादी विचारामुळे सक्रीय राजकारणात सहभागी झाल्या. तत्पूर्वी त्या राज्यसभेच्या उपसभापती व इ.स. १९६२ ते इ.स. १९८५ दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार व विविध खाताच्या मंत्री होत्या

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर