दिनविशेष १७ डिसेंबर
दिनविशेष
दि. १७ डिसेंबर
१. (१९११) विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रणाच्या अत्यंत दुर्मिळ हातोटीमुळे अनेक नामवंतांकडून सन्मानित झालेले चित्रकार व लेखक दत्तात्रय धोंडो उर्फ डी. डी. रेगे यांचा जन्म
लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत
२. (१९४१) अभिनेते विजू खोटे यांचा जन्म
ते मराठी व हिंदी चित्रपटांतून काम करणारे अभिनेते होते. त्यांनी ४४० पेक्षा अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांतून कामे केली
३. (१९८५) नाटककार, कथाकार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचे निधन
ते साहित्यातील आणि चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज नाव. ते मराठी नाटककार, कथाकार आणि कवी म्हणून प्रसिद्ध झालेच पण त्याचबरोबर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत ते गीतकार आणि पटकथाकार म्हणूनही प्रथितयश झाले. कालेलकरांनी एकूण २९ नाटके आणि मराठी व हिंदी मिळून १११ चित्रपटांसाठी लिखाण केले. त्यात त्यांनी कौटुंबिक, गंभीर, विनोदी, सामाजिक असे अनेक विषय हाताळले आहेत
४. (२०१०) गांधीवादी व समाजवादी विचारधारा जोपासणारे, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, शिक्षणतज्ञ, देवदत्त दाभोळकर यांचे निधन
ते संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक होते
५. (२०१९) जेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचे निधन
ते मराठी व हिंदी नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते व दिग्दर्शक होते. देवाला रिटायर करा असे म्हणत त्यांनी पुरोगामी आणि आणि तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला होता
पिंजरा, सामना यांसारखे चित्रपट आणि नटसम्राट, हिमालयाची सावली यांसारख्या अजरामर नाटकांमधून त्यांनी मराठी चित्रपट, नाट्यसृष्टी जिवंत केली
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment